Srinivas Vanaga: बंडावेळी एकनाथ शिंदेंनी श्रीनिवास वनगांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण पुढे करत सोडलेली मुंबई; नेमकं काय घडलेलं?
Palghar Srinivas Vanaga: गेल्या 12 तासांपासून श्रीनिवास वनगा बेपत्ता असून पोलीस आणि कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
Palghar Srinivas Vanaga Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) यांचे तिकीट कापून पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय आहे, असं कारण देत उमेदवारी नाकारल्याची माहिती स्वत: श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. माध्यमांसमोर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडताना देखील दिसले. तसेच गेल्या 12 तासांपासून श्रीनिवास वनगा बेपत्ता असून पोलीस आणि कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
प्रत्येक संधीवेळी मला डावलण्यात आले. खासदारकीच्या पोटनिवडणुकीतही मला डावलण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुठल्याही आमदाराला घरी बसवणार नाही, असं आश्वासन दिलं होते. मात्र एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला नाही, अशी नाराजी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली. दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना 64,040 मते मिळाली होती. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या योगेश नाम यांना 27,735 मते मिळाली. श्रीनिवास वनगा यांनी 40,305 मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होते.
बंडावेळी शिंदेंनी वनगांच्या मुलाच्या वाढदिवसाचे दिले होते कारण-
एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुरत गाठताना सहकारी आमदार यांना प्रथम आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण सांगून मुंबई सोडली होती. मात्र नंतर रात्रीच्या अंधारात तलासरी चेक पोस्ट ओलांडून बंड करणाऱ्या आमदारांनी सुरत येथे वास्तव्य केले होते. या बंड प्रकरणातील पहिल्या सत्रांपासून श्रीनिवास वनगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले होते. विशेष म्हणजे खासदार स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या जानेवारी 2018 मध्ये अकस्मात निधन झाल्यानंतर भाजपातर्फे वनगा कुटुंबीयऐवजी पर्यायी उमेदवार देण्याच्या हालचालीला वेग आला होता. यावेळी शिवसेनेत मंत्रीपदी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास यांना भाजपामधून शिवसेनेत प्रवेश देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र श्रीनिवास वनगा यांचा लोकसभेच्या पोटनवडणुकीत पराभव झाला होता. शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांचे पुनर्वसन करण्यासाठी विद्यमान आमदार अमित घोडा यांच्याऐवजी पालघर विधानसभेची उमेदवारी दिली होती. 2019 च्या निवडणुकीत श्रीनिवास वनगा 60 हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत श्रीनिवास वनगा हे चांगल्या संपर्कात राहून मतदार संघासाठी चांगला निधीही आणला असल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदेंकडून विधानपरिषदेचं आश्वासन-
आमदारकीच्या स्पर्धेतूनच एकनाथ शिंदेंनी वगळल्यानं, श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले आहेत. आमच्या प्रामाणिकपणाचं हेच का फळ? असा सवाल विचारणाऱ्या वनगांच्या मनात सध्या आत्महत्येचा विचार घोंघावू लागल्याचं त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगतिलं होतं. पण सध्या श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पत्नीशी फोनवरुन संवाद साधत त्यांना विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे.