एक्स्प्लोर
Advertisement
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ : 1995 पासूनच्या भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेस धडक देणार?
व्यक्तीच्या प्रतिमेवर तरणारा अकोला मतदारसंघ यावेळी आपली ओळख बदलेल काय? भाजपच्या या बालेकिल्ल्याला काँग्रेस धडक देणार काय? भाजपचे गोवर्धन शर्मा यावेळी 'डबल हॅट्ट्रिक' मारणार काय?, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही निवडणूक असणार आहे
अकोला : एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचं लोकांमध्ये सहज मिसळणं, त्याचं 'लो प्रोफाईल' वागणं, खरंच अशा गोष्टी आणि गुण एखाद्या मतदारसंघाची राजकीय समीकरणं ठरवत असेल का?. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात या सर्व प्रश्नांची उत्तरे 'होय' अशी आहेत. कारण, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या राजकीय यशाचं हेच रहस्य आहे. गेल्या पाच टर्म म्हणजेच सलग पंचवीस वर्षांपासून त्यांचा या मतदार संघावर 'एकछत्री' अंमल आहे.
2014 पर्यंत 'बकाल' शहर अशी ओळख असलेलं अकोला अलिकडच्या पाच वर्षांत काहीसं बदलतांना दिसतं आहे. मात्र, नागपुर, अमरावतीच्या तूलनेत अकोला विकासाच्या बाबतीत आजही माघारल्याचं शल्य अकोलेकरांना आहे. सध्या दिल्लीपासून अकोल्यातील महापालिकेच्या गल्लीपर्यंत भाजपाची 'शत प्रतिशत' सत्ता आहे. मात्र, आजही अकोला विकासासाठी चाचपडतांना दिसत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात आमदार गोवर्धन शर्मांची ओळख 'लालाजी' अशी आहे. या निवडणुकीतील तिकिटाचं गणित, विरोधकांच्या आव्हानांना 'लालाजीं'ची 'कला' तोंड देऊ शकणार काय?, याची चर्चा अकोल्यातील राजकीय कट्ट्यांवर सुरू झाली आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या मुख्यालयाचा मतदारसंघ पूर्णतः शहरी असलेल्या या मतदारसंघात 3 लाख 27 हजार 134 मतदार आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत अनेक राजकीय लाटा आणि वादळं आलीत पण, या मतदारसंघावरील भाजपची मांड ना ढिली झाली ना खिळखिळी. तर प्रत्येक निवडणुकीत भाजपचे 'कमळ' येथे मोठ्या दिमाखात आणि ताकदीने उमलत गेलेय. याआधी या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं आहे. भाजपच्या या मतदारसंघातील ताकदीचे मर्म लपलेय ते मजबूत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे अन् या सर्वांना एका धाग्यात बांधणारे गोवर्धन शर्मा अर्थातच 'लालाजी' यांना.
2014 च्या विधानसभा निकालाची आकडेवारी
गोवर्धन शर्मा : भाजप : 66,934
विजय देशमुख : राष्ट्रवादी : 26,981
आसिफखान : भारिप-बमसं : 23,927
गुलाबराव गावंडे : शिवसेना : 10,572
उषा विरक : काँग्रेस : 9,164
मतदारसंघातील मतदारसंख्या (लोकसभा निवडणुक आकडेवारीनुसार)
- एकूण मतदार : 3,27,134
- पुरुष मतदार : 1,65,914
- स्त्री मतदार : 1,61,206
- संजय धोत्रे : भाजप : 78,769
- हिदायत पटेल : काँग्रेस : 63,638
- प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 23,741
- अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था.
- अतिक्रमन आणि पार्किंग.
- अस्वच्छता
- औद्योगिक वसाहतीचं बकालपण.
- विमानतळ विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न.
- मोर्णा नदी, असदगड किल्ल्याची दुरावस्था.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement