एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ : ज्याच्याकडे धन तोच ‘गंगाखेड’चा धनी   

एकूणच काय तर यंदाही या निवडणुकीत विकास सोडून पैसा हाच केंद्रस्थानी राहणार हे स्पष्ट आहे.

परभणी : निवडणूक म्हटलं कि कुठल्याही मतदार संघाची एक वेगळी ओळख असतेच. अगोदर सर्वात गरीब मतदार संघ म्हणून आणि आता राज्यातील सर्वात श्रीमंत मतदार संघ म्हणून गंगाखेड विधानसभा मतदार संघ केवळ राज्यातच नव्हे तर देशात पोचला आहे. इथे निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराला आपल्याकडे पैसे किती आहेत याचं गणित लावावं लागतं. काळी कसदार जमीन अन् गोदावरी नदीचा समृद्ध वारसा लाभेलला मतदार संघ म्हणजे "गंगाखेड". राखीव असलेला हा मतदार संघ 1995 पर्यंत शेकापचा गढ होता. सलग चार वेळा शेकापकडून विधानसभेत जाण्याचा बहुमान ज्ञानोबा हरी गायकवाड यांना मतदारांनी दिला. मात्र शेकापच्या या गढावर 1995 ला अभ्युदय बँकेचे चेअरमन सीताराम घनदाट यांनी अपक्ष निवडून येत वर्चस्व प्रस्थापित केले. 1995 ते 2004 असे सलग 10 वर्ष घनदाट यांनी या आपले वर्चस्व कायम ठेवले. 2004 च्या निवडणुकीत तत्कालीन भाजप नेते डॉ मधुसूदन केंद्रे यांच्या मदतीने भाजपच्या विठ्ठल पुरभाजी गायकवाड यांनी घनदाट यांना पराभूत केले. महत्वाचं म्हणजे पुनर्रचनेत हा मतदार संघ राखीव मधून सर्वसाधारण गटात आला. यावेळी गायकवाडांना निवडून आणणाऱ्या डॉ मधुसूदन केंद्रे यांना 2009 ला सीताराम घनदाट हे स्वतः एसी असताना सर्व साधारण मतदार संघातून पराभूत करुन पुन्हा या मतदार संघावर पकड जमवली.  पण पाडापाडीच्या राजकारणात गंगाखेडचा विकास मात्र पुर्णपणे खुंटला. विकास तर सोडा साधा रस्त्याचाहि प्रश्न या लोकप्रतिधींना सोडवता आला नाही हे विशेष. या मतदार संघात खरा ट्विस्ट आला तो 2010 ला उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्स हा कारखाना सुरु करुन या मतदार संघाच्या राजकारणात उडी घेतली. यांनतर अनेक घडोमोडी घडल्या आणि भाजपचे नेते डॉ मधुसूदन केंद्रे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले. अन् राष्ट्रवादीतून तयारी करणाऱ्या गुट्टे यांनी रासपमध्ये प्रवेश केला. राज्यातील चारही महत्वाच्या पक्षांनी स्वबळावर लढलेल्या 2014 विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातुन गुट्टे यांनी भाजपच्या कोट्यातून रासपकडून केंद्रे यानी राष्ट्रवादीकडून तर विद्यमान आमदार सीताराम घनदाट यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मग काय एक मोठा उद्योजक, एक देशातील सर्वात मोठ्या मल्टीस्टेट बँकेचा चेअरमन तर नेता आणि कंत्राटदार असे तिन्ही उमेद्वार तगडे झाल्याने या मतदार संघात राज्यातील निवडणुकीत कुठेही असे लक्ष्मी अस्त्र पहिले नाहीत ते इथल्या मतदारांना अनुभवायला मिळाले. गुट्टे,घनदाट यांच्यावर या प्रकरणात गुन्हे हि दाखल झाले आणि शेवटी लोभापायी विकासाचा मुद्दाच विसरलेल्या इथल्या मतदारांनी डॉ मधुसूदन केंद्रे याना केवळ 2289 मतांनी निवडून देत दुसऱ्या क्रमांकावर गुट्टे तर विद्यमान आमदार सीताराम घनदाट हे तिसऱ्या नंबर ला गेले.तर शिवसेनेकडून नशीब आजमावणाऱ्या डॉ शिवाजी दळणर याना चौथे स्थान इथल्या मतदारांनी दिले. मागच्या पाच वर्षात या मतदारसंघातील परिस्थिती काही बदलली नाही. राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या डॉ मधुसूदन केंद्रे यांनी पराभूत उमेदवार तथा रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर 328 कोटींचे कर्ज प्रकरण न्यायालयात उभे केले.  याचाच संघर्ष गुट्टे आणि केंद्रे यांच्यात मागच्या पाच वर्षात सुरु आहे. सध्या गुट्टे याच प्रकरणात लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून न्यायलयीन कोठडीत आहेत. असं असताना त्यांनी यावेळच्या निवडणुकीत उभे राहण्याची तयारी केली आहे. जर काही तांत्रिक अडचण आली तर गुट्टे हे आपली कन्या स्वाती गुट्टे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. तिकडे आजपर्यंत अपक्ष लढलेल्या सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मागितल्याने विद्यमान आमदार डॉ मधुसूदन केंद्रे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसकडूनहि तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. शिवाय काही धनदांडग्या अपक्षांनीहि इथून लढण्याची तयारी केलीय. युतीत हा मतदार संघ पूर्वीपासून भाजपकडे होता मागच्या यंदा मात्र शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासाठी हा मतदार संघ सोडवून घेण्याच्या हालचाली पक्षात सुरु आहेत. एकूणच काय तर यंदाही या निवडणुकीत विकास सोडून पैसा हाच केंद्रस्थानी राहणार हे स्पष्ट आहे. धनदांडग्यांना वंचित बहुजन देणार टक्कर  गंगाखेड मतदार संघात मराठा,मुस्लिम,ओबीसी हे तिन्ही घटक बहुसंख्य तर एससी, एसटी, इतर फॅक्टरहि महत्वाचे आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून एखादा सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आला तर या धनदांडग्या उमेदवारांना चांगली टक्कर देऊ शकतो. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे लक्ष हे वंचित कडे लागले आहे. गंगाखेड मतदार संघावर दृष्टीक्षेप
  • विद्यमान आमदार : डॉ मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी)
  • तालुके : गंगाखेड,पालम,पुर्णा
  • एकूण गावं : 260
  • एकूण मतदार : 3  लाख 83 हजार 864
गंभीर प्रश्न
  • शहर आणि ग्रामीण पाण्याचा प्रश्न गंभीर
  • औद्योगीकरनाचा प्रश्न मोठा
  • एमआयडीसी कडे जमीन असून औद्योगिक करण 0 %
  • तिन्ही तालुक्यातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न
  • बेरोजगारी,शैक्षणिक सुविधांची वानवा
  • गोदावरी असून सिंचनाचा प्रश्न गंभीर
  • मुळी बंधाऱ्याच्या तुटलेल्या दरवाज्याचा प्रश्न गंभीर
  • पालम मधील जांभूळ बेट सारखे पर्यटन केंद्र दुर्लक्षित
  • पालम बस स्थानक आणि रुग्णालयाचा प्रश्न
  • अनेक वर्षांपासून रखडलेले उड्डाणपुलाचे काम
  • केंद्रे-गुट्टे यांच्या वादात एकमेव कारखाना अडचणीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget