एक्स्प्लोर

Ovala-Majiwada Assembly Election 2024 : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ

Ovala-Majiwada Assembly Constituency : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आमदार प्रताप सरनाईक यांना गड राखण्यासाठी ठाकरे गटाच्या नरेश मणेरा यांचं आव्हान आहे.

Ovala-Majiwada Assembly Election 2024 : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून प्रताप सरनाईक सलग तीन वर्ष निवडून आले आहेत. आता चौथ्या वेळेत मतदार राजा प्रताप सरनाईकांना कौल देणार की, दुसऱ्या उमेदवाराला संधी देणार हे पाहावं लागणार आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघात म्हणजे ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती. याच कारणामुळे ओवळा-माजिवडा उच्चभ्रूंचा मतदारसंघ म्हणूनही ओळखली जातो. 

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ

गेल्या तीन टर्ममध्ये शिवसेनेने ओवळा-माजिवडामध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. सलग तीन वेळा आमदार बनल्याने प्रताप सरनाईकांसाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचं म्हटलं जात आहे. आता बंडानंतर येथील मतदार प्रताप सरनाईकांचीच साथ देणार की, ठाकरे गट किंवा मनसे इथे यश मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आमदार प्रताप सरनाईक यांना गड राखण्यासाठी ठाकरे गटाच्या नरेश मणेरा यांचं आव्हान आहे.

मतदारसंघातील प्रमुख लढती

  • प्रताप सरनाईक - शिवसेना
  • नरेश मणेरा - शिवसेना ठाकरे गट
  • संदीप पाचंगे - मनसे

मतदारसंघ कसा आहे?

हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता सीमित नाही. तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये देखील त्याचा काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर,  वर्तकनगर शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात येतात.

मतदारसंघाचा इतिहास 

2009 मतदारसंघांची पुर्नरचना करण्यात आल्यानंतर ओवळा-माजिवजा मतदारसंघ बनवण्यात आला. 2009 च्या आधी ठाणे आणि बेलापूर हे विधानसभा मतदारसंघ खूप मोठे असल्याने यांचं विभाजन करण्यात आले. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर ठाणे शहर मतदारसंघातील काही भाग आणि बेलापूर मतदारसंघातील मोठा भाग जोडून ओवळा-माजिवडा मतदारसंघ नावारुपाला आला. तेव्हापासून म्हणजेच 2009 पासून प्रताप सरनाईक यांना शिवसेनेकडून ओवळा-माजिवडा या मतदारसंघासाठी तिकीट मिळत असून त्यांनी गड कायम राखला आहे.

मतदारसंघातील सद्यस्थिती

प्रताप सरनाईक यांनी 2009 पासून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात विजयाचा गड कायम राखला आहे. 2014 मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळ्या तिकिटांवर निवडणूक लढवत होते. त्यावेळी देखील प्रताप सरनाईक यांनी या मतदारसंघात एकहाती सत्ता कायम राखली. भाजपच्या संजय पांडे यांनी प्रताप सरनाईक यांना चुरशीची लढत दिल्यानंतरही प्रताप सरनाईक 2014 मध्ये मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.

2019 निकाल

  • प्रताप सरनाईक - शिवसेना (117593 मते)
  • भीमसेन चव्हाण - काँग्रेस (33585 मते)
  • संदीप पाचंगे - मनसे (21132 मते)

2014 चा निकाल

  • प्रताप सरनाईक - शिवसेना (68571 मते)
  • संजय पांडे - भाजप (57665 मते)
  • हणमंत जगदाळे - राष्ट्रवादी (20686 मते)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget