एक्स्प्लोर
Advertisement
आक्रमकतेसोबत संयमही गरजेचा, कणकवलीतील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना सल्ला
काही मिळवण्यासाठी भाजपमध्ये आलो नसून कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
कणकवली : अखेर नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. कणकवलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीत नितेश राणेंसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी आक्रमकतेसोबत संयमही गरजेचा असल्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. नितेश राणेंचा स्वभाव मुळत: आक्रमक आहे. पण त्यांना सयंम गरजेचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रचारसभेच मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं. तसंच नितेश राणे भरघोस मतांनी विजयी होतील अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. एकूण मतदानाच्या 65 ते 70 टक्के मतं नितेश राणे मिळतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांच्या विरुद्ध सतीश सावंत हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. तरी देखील, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जाहीर टीका करण्याचं टाळलं.
तसेच कणकवलीत ज्या पद्धतीनं सगळे एकत्र आलेत. ते पाहता विचलित होण्याची अजिबात गरज नाही. आपला विजय निश्चित आहे. त्यामुळं आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडं दुर्लक्ष करा. प्रेमानं आणि शांततेने लढा. जिंकणाऱ्या लोकांनी वाघासारखं राहायचं असतं,' असाही मुख्यमंत्री म्हणाले.
Nitesh Rane | राणेंना शिव्या देणं हाच शिवसेनेचा अजेंडा, नितेश राणे यांच्याशी बातचीत | ABP Majha
आजचा पक्षप्रवेश मुंबईत होणार होता, पण स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे हा पक्षप्रवेश मुंबईऐवजी कणकवलीत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं, यापुढेही त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल यात काहीही शंका नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नारायण राणे आक्रमी आहेत मला त्यांचा मूळ स्वभाव बजलायचा नसून मला त्यात संयमाची भर घालायची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान नारायण राणे यांनी आपल्या भाषणात आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केल्याची घोषणा केली. तसेच काही मिळवण्यासाठी भाजपमध्ये आलो नसून कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
Majha Vision 2019 | नव्या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचं व्हिजन, निवडणुकीआधी मुख्यमंत्री 'माझा'वर | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement