एक्स्प्लोर
Advertisement
बीडमध्ये काकांच्या चारित्र्यावर पुतण्याची जहरी टीका
या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप शिरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
बीड : बीडमध्ये काका विरुद्ध पुतण्या यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतो आहे. संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावरती एकेरी टीका केली होती. त्याला उत्तर देताना नशेत बोलणाऱ्यांना मी उत्तर देत नाही असं वक्तव्य जयदत्त क्षीरसागर यांनी केलं होतं. याचा चांगलाचं समाचार घेत संदीप क्षीरसागर यांनी थेट काकांच्या चारित्र्याचे पुरावे देण्यापर्यंत जहरी टीका केली.
बीडमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर बागलाने इस्टेटमध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या वरती जहरी टीका केली. संदीप क्षीरसागर म्हणाले की, आम्ही गुंडागर्दी करतो आम्ही असेच बोलतो असा आरोप आमच्या काकांनी आमच्यावर केले, पण मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही मी फक्त राजकीय टीका करत गेलो. पण मला वाटतं मी बोललो पाहिजे. मी पण वैयक्तिक टीका करु का? असं उपस्थित जनसमुदायाला विचारलं आणि जनतेतून हो आल्यानंतर बोलायला सुरुवात केली.
जयदत्त क्षीरसागरांनी मंत्रिपदासाठी 50 कोटी रुपये दिले : संदीप क्षीरसागर | बीड | ABP Majha
यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले की, 'आमच्या काकांच्या चारित्र्याचे पुरावे मी हा कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांना देतो. ते पुरावे तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये तपासा ते जर खोटे निघाले तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायलासुद्धा तयार आहे'.
एकूणच बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये काका-पुतण्या मधला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप शिरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
Jaydutt Kshirsagar on NCP | दिव्याचं रक्षण केलं पण दिवाच पोळतोय, जयदत्त क्षीरसागरांचा पवार, मुंडेंवर निशाणा | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement