एक्स्प्लोर

महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध ; शेतकरी आणि तरुणांसाठी आश्वासने

विधानसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेस आणि राष्ट्रावादी महाआघाडीचा जाहीरनामा आज (सोमवारी) प्रसिद्ध करण्यात आला. भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता देण्यासाठी विशेष कायदा आणणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचा जाहीरनामा आज (सोमवारी) प्रसिद्ध करण्यात आला. महाआघाडीच्या जाहीरनाम्यात शेती, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, पर्यावरण, सामाजिक न्याय या मुद्यांवर भर देण्यात आला आहे. महाआघाडीच्या नव्या जाहीरनाम्यात नव्या उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या, तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता देण्यासाठी विशेष कायदा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महाआघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण या वेळी उपस्थित होत्या. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील पदवीधर बेरोजगारांना किमान 100 दिवसांचा रोजगार, राज्य सरकारच्या विविध खात्यात रिक्त असलेल्या जागांवर 100 दिवसांत भरती करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. महाआघाडीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाची आश्वासने - नव्या उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा - शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणार - शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्व लक्षात घेता शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार - विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रश्न सोडविणे, परीक्षा निकाल वेळापत्रकानुसार पार पडण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हक्क आयोगाची स्थापना करणार - तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता - उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणार - कामगारांचे किमान वेतन 21 हजार रुपये करणार - UPSC प्रमाणेच MPSC चे वेळापत्रक निश्चित करणार तसेच या परीक्षेचा निकाल 45 दिवसांत जाहीर करणार - निमशहरीआणि ग्रामीण भागातील पदवीधर बेरोजगारांना किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार - राज्य सरकारच्या विविध खात्यात रिक्त असलेल्या जागा 100 दिवसांत भरण्याची प्रक्रिया सुरू करणार - मनरेगा अंतर्गत किमान 200 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार - प्रत्येक जिल्ह्यात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करणार - राज्यातील प्रत्येक नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत आणणार - सर्व महानगरपालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंत असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार - नव्या मोटार वाहन कायद्यात आकारण्यात येणार दंड कमी करणार - महाराष्ट्रातील दहावी पास दहा लाख तरुणींना पहिल्या वर्षात मोफत लॅपटॉप देण्यात येणार

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Embed widget