एक्स्प्लोर

Nashik Central Vidhan Sabha Election Result 2024 : नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे सलग तिसऱ्यांदा विजयी, ठाकरे गटाच्या वसंत गितेंचा पराभव

Nashik Central Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 मध्ये वसंत गितेंनी माघार घेतल्याने या ठिकाणी देवयानी फरांदे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांच्यात लढत रंगली होती.

Nashik Central Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजल्यापासून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ (Nashik Central Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला. या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीतून (Mahayuti) भाजपने (BJP) पुन्हा एकदा विद्यमान आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) वसंत गीते (Vasant Gite) यांना संधी दिली. या निवडणुकीत देवयानी फरांदे आपला गड राखणार की वसंत गीते धक्का देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपच्या देवयानी फरांदे यांनी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. 

सन 2009 मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नाशिक शहरातील मतदारसंघांचे विभाजन होऊन नाशिक मध्य मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघातील सामाजिक व जातीय समीकरणे काँग्रेसला पूरक असली तरी 2009 सालच्या निवडणुकीत या मतदारसंघाने मनसेच्या बाजूने कौल दिला होते. वसंत गितेंनी मनसेकडून उमेदवारी करीत काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा 31 हजार मतांनी पराभव केला होता. परंतु, 2014 मध्ये मात्र भाजपच्या देवयानी फरांदे यांनी वसंत गितेंचा 28 हजार 287 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये वसंत गितेंनी माघार घेतल्याने या ठिकाणी देवयानी फरांदे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांच्यात लढत रंगली होती. परंतु, देवयानी फरांदे यांनी हेमलता पाटील यांचा 28 हजार 387 मतांनी पराभव केला होता. 

देवयानी फरांदे यांची विजयाची हॅटट्रिक 

काँग्रेसच्या हेमलता पाटील यंदाही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र नाशिक मध्यची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटली. ठाकरे गटाने माजी आमदार वसंत गीते यांना तिकीट जाहीर केले. यामुळे हेमलता पाटील नाराज झाल्या होत्या. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अंकुश पवार यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून माघार घेतली. आता या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांनी हॅटट्रिक केली आहे. देवयानी फरांदे यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

आणखी वाचा 

Nashik West Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटलांमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Embed widget