एक्स्प्लोर
मोदींनी मोठ्या उद्योजकांची कर्ज माफ केली, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना देशोधडीला लावलं : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठ्या उद्योजकांची कर्ज माफ केली, परंतु देशातला शेतकरी मात्र कर्जातच आहे. तसेच जीएसटीमुळे छोट्या उद्योजकांना त्यांनी देशोधडीला लावलं आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठ्या उद्योजकांची कर्ज माफ केली, परंतु देशातला शेतकरी मात्र कर्जातच आहे. तसेच जीएसटीमुळे छोट्या उद्योजकांना त्यांनी देशोधडीला लावलं आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. आज (मंगळवारी)राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात (गुजरातमध्ये)भाषण केले.
आज गुजरातमधील गांधीनगर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गांधीनगरध्येच आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. राहुल म्हणाले की, "मोदी जिथे-जिथे जातात तिथे-तिथे खोटं बोलतात. त्यांनी देशवासियांची फसवणूक केली आहे."
राहुल यांनी नेहमीप्रमाणे राफेलवरुन मोदींना लक्ष्य केले. राहुल म्हणाले की, "राफेल कराराद्वारे मोदींनी भारतीय हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानीच्या घशात घातले. ज्याला कागदाचे विमान बनवता येत नाही, त्या अनिल अंबानीला मोदींनी राफेलचे काम दिले आहे."
राहुल यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरुनही सरकारला लक्ष्य केले. राहुल म्हणाले की, नोटबंदीनंतर बँकांबाहेर खूप मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगांमध्ये तुम्हाला नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारखे लोक दिसले का? ज्या लोकांकडे काळा पैसा आहे, असे किती लोक तुम्ही रांगांमध्ये पाहिले?
संबधित बातमी : दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेच्या आश्वासनांचं काय झालं? प्रियांका गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement