एक्स्प्लोर
नरेंद्र मोदींना 'ठाकरे'प्रेमाचा उमाळा तर उद्धव ठाकरेंकडूनही मोदींचे गोडवे
पंतप्रधान मोदींनाही ठाकरेप्रेमाचे उमाळे आल्याचे चित्र आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे आयोजित महायुतीच्या सभेत पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आजच 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींच्या धोरणावर टीका केली आहे.
![नरेंद्र मोदींना 'ठाकरे'प्रेमाचा उमाळा तर उद्धव ठाकरेंकडूनही मोदींचे गोडवे Narendra Modi on Uddhav Thackeray and Balasaheb Thackeray in Latur नरेंद्र मोदींना 'ठाकरे'प्रेमाचा उमाळा तर उद्धव ठाकरेंकडूनही मोदींचे गोडवे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/09130315/modi-uddhav-mankibat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सत्तेत असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाहीर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सारे 'गिले-शिकवे' विसरून मोदींचे गोडवे गायले तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनाही ठाकरेप्रेमाचे उमाळे आल्याचे चित्र आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे आयोजित महायुतीच्या सभेत पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आजच 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींच्या धोरणावर टीका केली आहे.
भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'माझे लहान भाऊ' असा करून मोदींनी आपले ठाकरेप्रेम दाखवून दिले. तर काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्त्व हिसकावून घेतलं होतं तसेच त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला. सोबतच घराणेशाहीवर टीका करताना देखील देखील त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत घराणेशाही करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंकडून शिकावं, असा सल्लाही दिला.
UNCUT | वल्लभभाईंप्रमाणेच तुम्हीही मराठवाड्याच्या पाठीशी राहा, उद्धव ठाकरे यांचं भाषण | लातूर | एबीपी माझा
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींची स्तुती करायला कुठेही कमी पडू दिलं नाही. सुरुवातीलाच भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याबद्दल मोदीजींचं आभार मानतो, अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं. रझाकारांच्या वेळेस जसे वल्लभभाई मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले तसेच मोदीजी तुम्ही उभे राहा, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. सोबतच आम्ही आमचा उमेदवार मोदीजींच्या रूपात आम्ही आमचा उमेदवार घोषित केला आहे. आता विरोधकांनी आपला पंतप्रधान उमेदवार घोषित करावा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
शिवसेना-भाजप सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर अनेकदा टीकास्त्र सोडलं होतं. राम मंदिर, नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, राफेल, शेतकरी कर्जमाफी इत्यादी मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपला कोडींत पकडण्याचे प्रयत्न केले होते. अनेकदा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका केली होती. काही वेळा भाजपकडूनही मोदींवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न झाले होते.
VIDEO | लातूरच्या औसा येथे महायुतीची जाहीर सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण | लातूर | एबीपी माझा
एकूणच सत्तेत एकत्र असले तरी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र योग जुळून येत नव्हता. अखेर आजच्या सभेत दोन्ही नेते एकत्र आले आणि एकमेकांविषयी भरभरुन प्रेम देखील व्यक्त केले.
शरदराव तुम्ही तिकडं शोभत नाहीत, पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांसह शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आज फुटीरतावादी लोकांसोबत शरद पवार उभे आहेत. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, तुम्हाला हे शोभत का? राजकारण वेगळी गोष्ट मात्र शरद पवार तिकडं शोभत नाहीत, अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)