(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Modi : नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीची नवी वेळ जाहीर , राष्ट्रपती भवनातून मोठी अपडेट, जाणून घ्या
Narendra Modi : राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात तयारी सुरु आहे. राष्ट्रपती भवनातून पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आलं आहे.
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेतृत्त्वातील एनडीएच्या (NDA) नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीत एनडीएच्या खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड केली. यामुळं नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नियुक्त केलं. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा 9 जूनला होणार आहे.
शपथविधी कधी होणार आणि वेळ कोणती?
राष्ट्रपती भवनातून प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार 09 जून 2024 रोजी सायंकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएच्या घटकपक्षांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्यानंतर एनडीएला बहुमत मिळू शकते अशी खात्री झाल्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम 75(1) च्या अनुसार नरेंद्र मोदींची भारताच्या पंतप्रधान पदी नियुक्ती केली.
President to administer oath to Narendra Modi and his council of ministers at 7.15 pm on June 9: Rashtrapati Bhavan
— Press Trust of India (@PTI_News) June 7, 2024
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांची यादी मागवली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नरेंद्र मोदींना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ कळवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावांची यादी देखील मागवण्यात आली आहे.
एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना पाठिंबा असलेल्या खासदारांची सोपवली आणि सरकार बनवण्याचा दावा केला.
लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप, जदयू, टीडीपी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि लोकजनशक्ती पार्टी आणि इतर पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्यावर एनडीएनं बहुमताचा टप्पा पार केला आहे. जदयूचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी भाजपसोबत राहणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं. केंद्रात एनडीएच्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्रातून महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
संबंधित बातम्या :
नवीन लोकसभेत 543 पैकी 504 खासदार कोट्याधीश, सर्वात श्रीमंत तीन खासदार कोणते?
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला