Narayan Rane: बाळासाहेबांना 6 पाणी पत्र लिहून हातात दिलं, अन्...; नारायण राणेंनी भर सभेत शिवसेना सोडण्यामागील 'तो' किस्सा सांगितला
Narayan Rane: शेंबड्या माणसाचे नेतृत्व मला नको होतं, म्हणून मी शिवसेना सोडली असल्याचा खुलासा करत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
Narayan Rane on Uddhav Thackeray, सिंधुदुर्ग : बाळासाहेबांनी शिवसेना (Shiv Sena) काढली, वाढवली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना संपवली. आता थोडीशी राहिली असतांना ते आकाशात चालले आहे. 40 आमदार समोरून गेले, असं म्हणत त्या 40 मध्ये तुम्ही देखील होता का? असा मिश्किल सवाल दीपक केसरकर यांना केला. 2019 ला आम्हाला न सांगता उद्धव ठाकरे (Narayan Rane) गपचुप शरद पवारांकडे गेला. शरद पवारांचे वय वर्ष 84 आहे. मात्र पवार साहेब फासे टाकत असतात, पण ते थांबत नाहीत. चालता येत नाही तरी चालतात, बोलता येत नाही तरी बोलतात, आणि नको ते बोलतात. उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितल तूच मुख्यमंत्री हो, उद्धव ठाकरे यांनी पत्नीला विचारून सांगतो, असे म्हटले. मी शिवसेना सोडायला अजून एक कारण म्हणजे शेंबड्या माणसाचे नेतृत्व मला नको होतं, म्हणून मी शिवसेना सोडली असल्याचा खुलासा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्ग येथील दोडामार्गच्या सभेत बोलत होते.
बाळासाहेबांना 6 पाणी पत्र लिहून हातात दिलं, अन्
मी 39 वर्ष शिवसेनेत होते, मात्र उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री होण्याची पात्रता नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना बाळासाहेबांनी काढली. मला बाळासाहेबांनी अनेक पद दिली, मात्र माझं उद्धव ठाकरे सोबत पटले नाही. बाळासाहेबांना 6 पाणी पत्र लिहून हातात दिलं आणि निघालो. मला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भाडणं लावयच नव्हत, माझं आणि उद्धवचं पटणार नाही, शेवटी मी कोकणी माणूस स्वाभिमानी असतोच, असे म्हणत खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे यांनी दोडामार्ग येथे जाहीर सभा घेतली. यावेळी नारायण राणेंनी जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येऊन कणकवलीमध्ये दीपक केसरकारांवर टीका करतात. मालवणमध्ये येऊन नारायण राणेंवर आणि सावंतवाडीत येऊन केसरकरावर टीका करतात. मात्र कधीकाळी दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे यांचं फार सख्य होत, ते एकमेकांच्या कानात बोलायचे. असा मिश्किल टोलाही नारायण राणेंनी दीपक केसरकरांना लगावला.
पवारांच्या घरात अर्धा डझन राजकारणात, ही घराणेशाही नाही का?
सिंधुदुर्गात येऊन उद्धव ठाकरे यांनी कोकणाच्या विकासावर, रोजगार इत्यादी बाबत न बोलता, नारायण राणे, दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे नाही तर मोदी, शहा यांच्यावर बोलतात. त्यांनी त्यावर बोलू नये त्यांची ती लायकी नाही. खड्ड्यात गाडीन, असे म्हणणार्या उद्धव ठाकरे यांना सांगायचे आहे की खड्डा खणायला पण ताकद लागते. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंनी टीकेचं लक्ष्य केलं, दुकानात माल नाही आणि बोर्ड लावतायेत आम्ही येतोय. दुकान खाली होत चाललं. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खाली होत चालली. आता राहिलेत कोण, 25 च्या वर आमदार येत नाहीत. सत्ता येत नाही. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री, मात्र अशी योजना आणून गरिबांच्या घरात पैसे जातील असं वाटलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या घरात घराणेशाही नाही का?, शरद पवारांच्या घरातील अर्धा डझन राजकारणात उभे आहेत, राहुल गांधी अकरावे आहेत, ही घराणेशाही नाही का? फक्त राणेंवर टीका, असा घणाघातही नारायण राणेंनी यावेळी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या