एक्स्प्लोर

नंदुरबार लोकसभा : भाजपला मोदींच्या 'विकास तंत्राचा' तर काँग्रेसला 'प्रियांका अस्त्रा"चा आधार

अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीनंतर जिल्ह्यात 32 हजार 544 नव्या मतदारांची भर पडली आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक महिला मतदारांचा समावेश आहे. त्यात काँग्रेस अजूनही उमेदवार निश्चित करत नाही आणि गटतट संपवू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा घोषवाक्याप्रमाणे केंद्रात 'अब की बार फिर मोदी सरकार' आणि नंदुरबारात डॉक्टर गावित सरकार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश घेतला असून त्यांची पहिली प्रचारसभा नंदुरबार जिल्ह्यात घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी सुरु केला आहे. यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ यंदाही पुन्हा संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणार हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यापूर्वीही स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जाहीर सभांनी काँग्रेस प्रचाराचा प्रारंभ झाला होता. नंतरच्या काळातही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सभा होत आल्या आहेत. परंतु मागील 2014 सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोदी लाटेवर स्वार होऊन नंदुरबार मतदारसंघात विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले तत्कालीन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित, त्यावेळी भाजपाच्या तिकीटावर एक लाखाहून अधिक मताधिक्क्याने नंदुरबार मतदारसंघातून निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार नेते माणिकराव गावित पराभूत झाले होते. भाजपासाठी हा ऐतिहासिक विजय ठरला होता. कारण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर प्रथमच भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता. या अर्थाने भाजपाला यंदा पुन्हा विजय मिळवण्याचे आव्हान राहणार आहे, तर आपले पूर्व वर्चस्व स्थापित करण्याचे काँग्रेसपुढे आव्हान राहणार आहे. म्हणून दोन्ही पक्षांनी आतापासूनच कंबर कसली असून आपापल्या संभाव्य ऊमेदवारांना लोकसंपर्काच्या कामाला जुंपले आहे. भाजपतर्फे डॉक्टर हिना गावित याच पुन्हा उमेदवार राहतील असे स्पष्ट झालं आहे, तर काँग्रेसकडून सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नेते आमदार केसी पाडवी किंवा माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित या दोघांपैकी एक चेहरा लोकसभा उमेदवारीसाठी पुढे करण्यात येत आहे. काँग्रेस कारकिर्दीच्या 55 वर्षाच्या तुलनेत मोदी सरकारच्या पाच वर्षात झालेली विकास कामे सांगण्यावर डॉक्टर हिना गावित भर देताना दिसत आहेत. नंदुरबार लोकसभा : भाजपला मोदींच्या 'विकास तंत्राचा' तर काँग्रेसला 'प्रियांका अस्त्रा पूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अनेक प्रकारची विकासकामे पाहायला मिळतात. प्रमुख रस्त्यांच्या आणि महामार्गांच्या दुपदरीकरणाची आणि चौपदरीकरणाची सुरु झालेली कामं, मोदी सरकारने बाराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे पार पडलेले दुहेरीकरण, मोठ्या संख्येने मोबाईल टॉवर उभारुन लोकसभा मतदारसंघात  जनसंपर्काला दिलेला वेग, प्रत्येक नगरपालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण आणि शहर शहर विकासात पडलेली मोठी भर आणि शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार यांच्याशी संबंधित अनेक योजनांची झालेली अंमलबजावणी अशा काही कामांचा उल्लेख भाजपा समर्थक करतात. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक लाख घरांना वीज कनेक्शन देता आलं, एक लाख चाळीस हजार महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देता आला, असे अनेक उल्लेख स्वतः डॉक्टर हिना गावित जाहीरपणे करत असतात. सलग चार वेळेस संसदरत्न पुरस्कार मिळवून सन्मानित झालेल्या भाजपच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांची बाजू अर्थातच यामुळे उजवी ठरते. एवढी दमदार कामगिरी असल्यामुळे भाजपच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिना गावित याच पुन्हा रिंगणात राहणार हे जवळपास जाहीर झाल्यासारखे आहे. पक्षातून त्यांना पर्याय ठरणारा कोणताही चेहरा नसल्यामुळे देखील उमेदवारीचा मुद्दा त्यांच्यावर येऊन संपतो, हेही त्यांना उमेदवारी मिळण्या मागचे प्रमुख कारण आहे. भाजपाचे विद्यमान आमदार तथा डॉक्टर हिना गावित यांचे पिता डॉक्टर विजय कुमार गावित यांची येथील राजकारणावर जबरदस्त असलेली पकड हेच भाजपचे बलस्थान बनलं आहे. एकेकाळी इंदिरा मायचा परमभक्त असलेला आदिवासी समूह आता काँग्रेस प्रेमी राहिलेला नाही हे डॉक्टर गावित यांनी भाजपला भलं मोठं यश मिळवून देत सिद्ध केलं होतं. त्यापूर्वीही वारंवार सिद्ध केलं आहे. यामुळे काँग्रेसचं प्रियांका अस्त्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काय परिणाम परीणाम घडवणार? हे पुढे पाहायला मिळेल. तथापि जिल्ह्याचे संपूर्ण राजकारणच गावित परिवारावर केंद्रीत असल्यामुळे डॉक्टर गावित विरुद्ध अन्य पक्ष अशीच लढाई यंदाच्याही लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. डॉक्टर हिना गावित मागीलप्रमाणे पुन्हा मताधिक्क्याने निवडून येतील का? नंदुरबार लोकसभा : भाजपला मोदींच्या 'विकास तंत्राचा' तर काँग्रेसला 'प्रियांका अस्त्रा काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आमदार केसी पाडवी यांची कोरी पाटी आहे. लोकसभा निवडणुकीचा त्यांना पूर्वीचा अनुभव असून त्यासाठी लागणारा सर्वस्तरीय संपर्क ते जपून आहेत. काँग्रेसने त्यांना खासदारकीची कधी संधी दिली नव्हती. परंतु आता मिळालेल्या संधीचे सोने करण्याइतपत चांगले भांडवल त्यांच्याकडे नक्कीच आहे. उच्चशिक्षण, सर्वसमावेशक वागणूक आणि सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची धमक ही त्यांची जमेची बाजू असून त्यामुळे त्यांची गाडी पुढे सरकताना दिसत आहे. अमरीश भाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, सलग नऊ वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांच्यासारखे नेते आणि प्रत्येक तालुक्यातला युवा कार्यकर्ता पाठीशी असणं हे त्यांचं बलस्थान आहे. परंतु मोदींच्या लोकप्रियतेची सुप्त लाट थोपवण्याची शक्ती हे काँग्रेस नेते जोडू शकतील का? हा प्रश्नच आहे. अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीनंतर जिल्ह्यात 32 हजार 544 नव्या मतदारांची भर पडली आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक महिला मतदारांचा समावेश आहे. त्यात काँग्रेस अजूनही उमेदवार निश्चित करत नाही आणि गटतट संपवू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा घोषवाक्याप्रमाणे केंद्रात 'अब की बार फिर मोदी सरकार' आणि नंदुरबारात डॉक्टर गावित सरकार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यमान खासदार-डॉक्टर हिना विजयकुमार गावित 2014 निवडणुकीत पराभूत खा.माणिकराव गावित 2019 निवडणुकीतील संभाव्य उमेदवार भाजप- डॉक्टर हिना विजयकुमार गावित काँग्रेस- 1.भरत माणिकराव गावित 2.आ.कागडा चंद्या पाडवी (के.सी.पाडवी) संबंधित मतदारसंघांचा आढावा चंद्रपूर लोकसभा मतदार संघ : युती न झाल्यास हंसराज अहिरांना शिवसेनेकडून तगडी टक्कर जालना लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खोतकर यांच्यात रणसंग्राम! अकोला लोकसभा : प्रकाश आंबेडकरांचं राजकीय भवितव्य ठरणार मावळ लोकसभा : शिवसेनेच्या हॅटट्रिकला पार्थ पवारांचं आव्हान? दिंडोरी लोकसभा यंदा भाजपसाठी जड जाणार? राष्ट्रवादीचेही तगडे आव्हान पालघर लोकसभेसाठी रस्सीखेच; शिवसेना, भाजपची प्रतिष्ठा पणाला सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेसाठी राऊत आणि राणे यांच्यात प्रमुख लढत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget