एक्स्प्लोर

Nagarparishad Elections Results: भाजपला कुठे कुठे धक्का, शिंदे-दादा कुठे कुठे वरचढ ठरले? जाणून घ्या सविस्तर

Nagarparishad Elections Results: आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. तर काही ठिकाणी भाजपने विजयी गुलाल उधळला आहे.

पुणे: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज (रविवारी, ता २१) सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली आहे, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला (Nagarparishad Elections Results) जाईल. काही ठिकाणी मतमोजणीचे कौल समोर येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे.(Nagarparishad Elections Results)

Nagarparishad Elections Results: भाजपला कुठे कुठे धक्का, शिंदे-दादा कुठे कुठे वरचढ ठरले?

Nagarparishad Elections Results: मुखेड 

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिले यश आले आहे. एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिले यश मिळाले आहे.

Nagarparishad Elections Results: आटपाडी

आटपाडी नगरपंचायतमध्ये भाजपा सहा जागांवर विजयी झाले आहे, तर शिवसेना शिंदे गट सात जागांवर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाले आहेत, भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यु.टी जाधव विजयी झाले आहेत.

Nagarparishad Elections Results: लातूर

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने औसा नगरपरिषदेवर ताबा मिळवला आहे. 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय मिळवला आहे. 6 जागेवर भाजपाचा विजय झाला आहे, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, गेल्या वेळेस दोन वरून यावेळी काँग्रेस शून्यावर आली आहे.  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत.

Nagarparishad Elections Results: कोल्हापूर मुरगुड 

मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर सेनेच्या नगराध्यक्ष पदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे. हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये धक्का बसला आहे.

Nagarparishad Elections Results: विटा नगरपरिषद 

शिवसेना शिंदे पक्षाचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजपचे आठ उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Nagarparishad Elections Results: कराड 

कराडमध्ये भाजपा आणि काँग्रेसला धक्का  बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव  2000 मतांनी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.अतुल भोसले यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमध्ये सभा घेतली होती.

Nagarparishad Elections Results: मोहोळ 

मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या चूरशीच्या सामन्यात शिंदे गटाने बाजी मारली आहे.

Nagarparishad Elections Results: जेजुरी 

माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता जेजुरीमध्ये खालसा करण्यात अजित पवारांना यश मिळालं आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घवघवीत यश मिळालं आहे.  नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार तर भाजपाचे 2 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले आहेत.

Nagarparishad Elections Results: शिरूर

शिरूर नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी झाल्या आहेत. भाजपसह महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे.
भाजप-11
राष्ट्रवादी AP -5
महाविकास आघाडी-7
अपक्ष- 1

Nagarparishad Elections Results: मालवण 

मालवण नगर परिषदेत मंत्री नितेश राणेंना धक्का बसला आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेनेच्या १० जागा विजयी तर भाजपला फक्त ५ जागा मिळाल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांना मालवण नगर परिषदेत धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी मुसंडी मारली आहे.

Nagarparishad Elections Results: लांजा 

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर महायुतीचा दबदबा निर्माण झाला आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा(शिंदे सेना) झेंडा फडकला आहे. देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे विजयी झाले आहेत. लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. रत्नागिरी शिवसेनेनी आपला गड राखला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला

व्हिडीओ

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Maharashtra Live blog updates: मामाच्या गावावरून घरी परतणाऱ्या तरुणाचा तलावात आढळला मृतदेह, गोंदियातील घटना
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Mumbai Ganesh Idol Accident: स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Embed widget