एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल, भाजप 170 आणि तृणमूल काँग्रेसची 113 जागांवर आघाडी

Assembly Election Result 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के मतदान झालं आहे. तर आसाममध्ये जवळपास 86 टक्के मतदान झालं आहे. या निकालाचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर पाहू शकता.

LIVE

Key Events
West Bengal Election Result 2026 Live updates Mamta Banerjee BJP PM Modi Amit Shah TMC West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल, भाजप 170 आणि तृणमूल काँग्रेसची 113 जागांवर आघाडी
West Bengal Assam Election Results 2026 Live Updates
Source : abp majha

Background

Assembly Election Result 2026 Live Updates : देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, पुढील काही तासांत जाहीर होणार आहेत. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्तापालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोतणीला, आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे.  ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन,  हिमंता बिस्वा सरमांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला या निकालांवर अवलंबून आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष लागलं आहे. सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींचीच्या हाती पुन्हा सत्ता येणार की सत्तापालट होणार याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, निवडणूक निकालापूर्वी मुंबईत सट्टा बाजार तेजीत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असा सट्टेबाजाराचा कल आहे. तामिळनाडूत द्रमुक, आसाममध्ये भाजपला सट्टेबाजाराचा कौल आहे.

बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे.  बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. 

यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत.

तर आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असली तरी सगळ्या सर्व्हेमध्ये भाजपचे हिमंता बिस्वा सरमा हे पुन्हा सत्तेत येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

12:18 PM (IST)  •  04 May 2026

West Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजप 192, तृणमूल कॉंग्रेस 92 जागी पुढे

West Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या मतमोजणीनुसार, भाजप 192, तृणमूल कॉंग्रेस 92 जागी पुढे.

पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्याचं मोदी-शहांचं स्वप्न पूर्णत्वाकडे होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर, दुसरीकडे भवानीपूरमधून ममता बॅनर्जी 16 हजार 706 मतांनी आघाडीवर आहेत. 


12:05 PM (IST)  •  04 May 2026

West Bengal Election Result 2026 : बंगालमधून हुकूमशाही संपली, आता खऱ्या अर्थाने आता बंगालचा विकास सुरू होणार : गिरीश महाजन 

West Bengal Election Result 2026 : 

गिरीश महाजन On बंगाल निवडणूक

-  आज अतिशय आनंदाचा दिवस बंगालमधून हुकूमशाही संपलेली आहे.
- अतिशय दयनीय अवस्था ममता यांची झाली आहे.
- अन्याय आणि दडपशाही विरोधात नागरिकांनी आवाज उठवला आहे.
- खऱ्या अर्थाने आता बंगालचा विकास सुरू होणार आहे.
- आता यापुढे ममता दिदींचं नाव देखील कोणी घेणार नाही.
- आतापर्यंत ममता दीदींनी विकास थांबवला होता. 
- आता यापुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा मोठ्या प्रमाणात विकास करतील.
- लोकांचा विश्वास नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. 
- लोकांना आता विकास आणि प्रगती हवी आहे.
- भाजपला स्पष्ट बहुमत मिळत आहे.
- ममता दीदी यांच्या दादागिरी आणि हुकूमशाहीला नागरिक कंटाळे होते. 
- बंगाल मध्ये चमत्कारिक आकडा आहे ममता दीदी 100 च्या आहेत अतिशय आश्चर्यकारक आकडा आहे.
- या आकड्यातून ममता दीदी यांच्यावरचा लोकांचा राग दिसून येतो.
- बोगस मतदानातून ममता दीदी आतापर्यंत निवडून येत होते. 

On तामिळनाडू

- जे लोकप्रिय आणि अभिनेते असतात त्यांना तिथे यश मिळतो.

On evm 

- आपले काही बहादूर आहेत ते काय बोलतात आता बघा. 

2029 महाराष्ट्र 

- काँग्रेस ची अवस्था देखील दयनीय झाली आहे.
- काँग्रेसच्या कार्यकर्त्याना देखील त्यांच्या पक्षावर विश्वास राहिला नाही.
- संपूर्ण विश्वास मोदी आणि भाजपवर आहे.

On बारामती आणि राहुरी

- सुनेत्रा पवार हे जिंकणारच यात काही शंका नव्हती ते रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील.
- राहुरी देखील आम्ही जिंकतोय.
- विरोधीपक्ष नेता देखील मिळत नाही इतकी कमी संख्या विरोधकांकडे आहे.

On कुंभ 

- सव्वा वर्षामध्ये कुंभ सुरू होतोय मोठ्या प्रमाणात भाविक यावेळी येतील.
- जागा कमी आहे जागा आम्ही मोठी करत आहोत.
- कुशावर्त सारखे अजून काही कुंड आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये बांधतोय. 
- अतिशय वेगाने काम सुरू आहेत कोणी नाराज नाही. 
- कुंभमेळा कामात आम्ही कमी पडणार नाही 30 ते 35 हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहे.
- पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देखील यात लक्ष घालत आहेत. 
- सर्व काम आम्ही वेळेत पूर्ण करणार आहे.

On शेतकरी लाठीचार्ज

- लाठीचार्ज झाला नाही अशी प्राथमिक माहिती आहे मात्र मी शेतकरी आणि पोलीस यांच्याशी बोलेन. 

On त्र्यंबकेश्वर मंदिर काळाबाजार

- जे काळाबाजार करतात त्यांना आम्ही जेल मध्ये घातले आहे.
- अशा चुकीचे काम आम्ही खपवून घेणार नाही लवकरच या बाबत मी पुन्हा बैठक घेणार आहे.

On त्र्यंबकेश्वर अतिक्रमण 

- अतिक्रमण मध्ये ज्यांचे नुकसान झालं आहे त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांची देखील व्यवस्था आम्ही करू.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati and Rahuri Election Result 2026 Live Updates: बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'पॉवर' शो! अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंनाही मतं वाढली, जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडलं?
Baramati and Rahuri Election Result 2026 Live Updates: बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'पॉवर' शो! अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंनाही मतं वाढली, जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडलं?
West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल, भाजप 170 आणि तृणमूल काँग्रेसची 113 जागांवर आघाडी
West Bengal Live Updates: पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल, भाजप 170 आणि तृणमूल काँग्रेसची 113 जागांवर आघाडी
Assembly Elections 2026: कोलकातामधील टीएमसी कार्यालयात सन्नाटा, भाजप मुख्यालयात पुरी आणि जिलेबीचा बेत; चेन्नईत डीएमके कार्यालयात स्वागतासाठी लावलेला मांडव काढला
कोलकातामधील टीएमसी कार्यालयात सन्नाटा, भाजप मुख्यालयात पुरी आणि जिलेबीचा बेत; चेन्नईत डीएमके कार्यालयात स्वागतासाठी लावलेला मांडव काढला
Tamil Nadu Kerala Puducherry Election Results LIVE: केरळमध्ये काँग्रेस 100 जागांवर आघाडीवर, तर भाजप अवघ्या दोन जागांवर आघाडीवर
Tamil Nadu, Kerala, Puducherry Election Results LIVE: केरळमध्ये काँग्रेस 100 जागांवर आघाडीवर, तर भाजप अवघ्या दोन जागांवर आघाडीवर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assembly Elections 2026: कोलकातामधील टीएमसी कार्यालयात सन्नाटा, भाजप मुख्यालयात पुरी आणि जिलेबीचा बेत; चेन्नईत डीएमके कार्यालयात स्वागतासाठी लावलेला मांडव काढला
कोलकातामधील टीएमसी कार्यालयात सन्नाटा, भाजप मुख्यालयात पुरी आणि जिलेबीचा बेत; चेन्नईत डीएमके कार्यालयात स्वागतासाठी लावलेला मांडव काढला
Tamil Nadu Election Result 2026: थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा 'डीएनए'च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा 'डीएनए'च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
Bengal Election Result 2026: भवानीपुरात सीएम ममता आघाडीवर, मोदींनी झालमुरी खाल्ली त्या भागातील चार जागांवर कोण आघाडीवर; भाजपने अत्याचार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली त्यांचं काय झालं?
भवानीपुरात सीएम ममता आघाडीवर, मोदींनी झालमुरी खाल्ली त्या भागातील चार जागांवर कोण आघाडीवर; भाजपने आरजी कर अत्याचार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली त्यांचं काय झालं?
Tamilnadu Election Result 2026: थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!
थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!
Assam Election Result 2026 : आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी, पहिला कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी; हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम, तर काँग्रेसला किती जागा?
आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी, पहिला कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी; हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम, तर काँग्रेसला किती जागा?
Bengal Election Result 2026: बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चकित करणारे कल हाती; एसआयआरमुळे चर्चेत आलेल्या सर्वात संवेदनशील मतदारसंघात भाजप टीएमसी सोडून कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या चक्क काँग्रेसची आघाडी!
बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चकित करणारे कल हाती; एसआयआरमुळे चर्चेत आलेल्या सर्वात संवेदनशील मतदारसंघात भाजप टीएमसी सोडून कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या चक्क काँग्रेसची आघाडी!
West Bengal Election Result 2026 Amit Shah: पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, अमित शाहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं 'ते' वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त
बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, अमित शाहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं 'ते' वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त
Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?
Embed widget