एक्स्प्लोर

Mumbai North Lok Sabha Constituency Election Result 2024 : पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईचा गड राखला, दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी

Mumbai North Lok Sabha Constituency Election Result 2024 : भाजपने मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना मैदानात उतरवले. तर काँग्रेसने स्थानिक उमेदवार भूषण पाटील (Bhushan Patil) यांना मैदानात उतरवले आहे,

Mumbai North Lok Sabha Constituency Election Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) विजयी झाले आहेत. पीयूष गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील (Bhushan Patil) यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. मात्र, गोयल यांनी दोन लाख 4 हजार 492 मतांनी पीयूष गोयल आघाडीवर असून  मतमोजणीच्या काही फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Lok Sabha Election) हा भाजपच्या उमेदवारासाठी सर्वात सुरक्षित लोकसभा मतदारसंघापैकी समजला जाणारा हा मतदारसंघ आहे. भाजपने या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना मैदानात उतरवले. तर काँग्रेसने स्थानिक उमेदवार भूषण पाटील (Bhushan Patil) यांना मैदानात उतरवले.  या लोकसभा मतदारसंघात बिगर मराठी भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. मागील दोन टर्म पासून या मतदारसंघात भाजपने एकहाती बाजी मारली होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली आहे. यंदा 57.02 टक्के इतके मतदान झाले. एकूण 10 लाख 33 हजार 241 मतदारांनी मतदान केले. 


मुंबई उत्तर लोकसभा निकाल 2024 (Mumbai North Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते  निकाल
पीयूष गोयल - भाजप 3 लाख 91 हजार 231 मते विजयी आघाडी
भूषण पाटील - काँग्रेस 1 लाख 86 हजार 739  


मतदानात घट

यंदाच्या निवडणुकीत सगळ्याच विधानसभा मतदारसंघात मतदानात एक ते 5 टक्क्यांची घट झाली. या मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रात  भाजप-शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर, एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांसह गुजराती,उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. जैन, मुस्लिम अशा अल्पसंख्याक मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. गुजराती मतदार हा भाजपच्या पाठिशी असल्याचे चित्र असते. 

विधानसभानिहाय किती मतदान झाले?

बोरिवली - 62.50 टक्के
दहिसर - 58.12 टक्के
मागाठणे - 55.66 टक्के
कांदिवली पूर्व - 54.48 टक्के
चारकोप - 57.83 टक्के 
मालाड पश्चिम - 53.52 टक्के


काँग्रेसकडून उशिराने उमेदवार जाहीर 

लोकसभा निवडणुकीत यंदा उत्तर मुंबईत काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाची साथ मिळाली. त्यामुळे बहुतांशी मराठी मते काँग्रेसकडे वळली. तर, भूषण पाटील स्थानिक उमेदवार असल्याचा मुद्दा प्रचारात आणला गेला. काँग्रेसची संघटना काहीशी विस्कळीत असली तरी शिवसेना ठाकरे गटामुळे काँग्रेसने निवडणुकीत आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. या मतदारसंघात काँग्रेसची जवळपास दोन ते अडीच लाख मते कायम राहिले असल्याचे चित्र मागील दोन लोकसभा निवडणुकीत दिसले होते.  मात्र, पीयूष गोयल यांच्या तुलनेत उशिराने उमेदवारी जाहीर झाल्याने भूषण पाटील यांना प्रचारासाठी कमी अवधी मिळला. त्याचा परिणाम काँग्रेसच्या मतांवर झाला असण्याची दाट शक्यता आहे. 


2019 चा निकाल काय होता? (Mumbai North Lok Sabha Constituency Result 2019)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. या निवडणुकीत शेट्टी यांना 7, 06,678 मते मिळाली. तर, उर्मिला मातोंडकर यांना 2,41,431 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीत भाजपने आमदार गोपाळ शेट्टी यांनी मोदी लाटेत काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा मोठा पराभव केला. शेट्टी यांना 6,64,004 मते मिळाली. तर, दुसरीकडे संजय निरुपम यांना 2,17,422 मते मिळाली. एकूण मतदानापैकी शेट्टी यांनी 70.15 टक्के मते मिळवली.  

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार 2019 प्रमाणे...

बोरिवली - सुनील राणे - भाजप
दहिसर - मनिषा चौधरी - भाजप
मागाठणे - प्रकाश सुर्वे - शिवसेना-शिंदे गट
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर- भाजप
चारकोप - योगेश सागर - भाजप
मालाड पश्चिम - अस्लम शेख - काँग्रेस

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget