मुंबईत ठाकरेंच्या सेनेला किती आणि मनसेला किती जागा मिळणार ? भाजपच्या बड्या नेत्यानं सांगितला आकडा
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात जाहीर सभा झाल्याचं पाहायला मिळालं. राजकीय नेत्यांकडून ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
Mumbai Mahapalika election : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात जाहीर सभा, गाठी भेटी दौरे केल्याचं पाहायला मिळालं. महापालिकेच्या निवडणुकीसाठी परवा म्हणजे गुरुवारी 15 जानेवापीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला टोला लगावला आहे. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला 45, राज ठाकरेंच्या मनसेला 20 जागा मिळतील असं भाकित चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, याबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीचाच महापौर आणि उपमहापौर होणार आहे. मी संख्या सांगण्यामध्ये माहीर मानला जातो. मुंबईत भाजप किती आणि शिवसेना किती हे मी नंतर कानात सांगतो. पण मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला 45 जागा मिळतील तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 20 जागा मिळतील असं भाकित चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यापुढे त्यांची गाडी बंद आणि महापैर करायला निघालेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 99 नगरसेवक होते
मुंबई महापालिका 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 99 नगरसेवक होते. मात्र, शिवसेना पक्षातील फुटीनंतर सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 54 नगरसेवक आहेत. गत 2017 च्या निवडणुकीत मनसे पक्षाचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यातील एक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत आणि सहा नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याने सद्यस्थितीत मनसेकडे एकही नगरसेवक नाही. दरम्यान, यावेळी दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मुंबईत महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका लढत आहेत. त्यामुळं दोघांची ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, त्यांच्यासमोर भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. या युतीचं मोठं आव्हान असणार आहे. यासाठी परवा म्हणजे गुरुवारी 15 जानेवारी 2026 ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर लगेच 16 जानेवारीला निकाल लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:




















