एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Result 2024: मुंबईचा 'किंग' कोण? ठाकरे विरुद्ध शिंदे काँटे की टक्कर, मनसेमुळे गणित बिघडणार?

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: मुंबई जिल्ह्यात एकूण 36 मतदारसंघ येतात. त्यापैकी 10 मुंबई शहरात आणि उर्वरित 26 मतदारसंघ मुंबई उपनगरात येतात. मुंबईतील लढती या आगामी राजकारणाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Mumbai District Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. काही वेळातच सुरुवातीचे कल हाती येतील. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच संपूर्ण राज्याचं काय? तर देशाचं लक्ष लागलं आहे, ते मुंबईकडे (Mumbai Vidhan Sabha Elecltion 2024). आगामी काळात गेल्या बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका येत्या काळात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मुंबई जिल्हा विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त आमदार निवडणून आणणं याकडे प्रत्येक पक्षाचं लक्ष असणार आहे. अशातच यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता विधानसभेत ठाकरे आपलं अस्तित्व टिकवणार की, शिंदे ठाकरेंवर मात करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी एकूण 4140 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुंबई जिल्ह्यात एकूण 36 मतदारसंघ येतात. त्यापैकी 10 मुंबई शहरात आणि उर्वरित 26 मतदारसंघ मुंबई उपनगरात येतात. मुंबईतील लढती या आगामी राजकारणाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. जो पक्ष मुंबईत बाजी मारतो, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील, अशा चर्चा सुरू आहेत. यादृष्टीनं मुंबई शहरातील 10 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.   

मुंबई शहरात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोण निवडणुकीच्या रिंगणात...? 

विधानसभा मतदारसंघ मविआचे उमेदवार महायुतीचे उमेदवार इतर पक्षांचे उमेदवार 
कुलाबा विधानसभा हिरा नवाजी देवासी (काँग्रेस) राहुल नार्वेकर (भाजप) अर्जुन गणपत रुखे (बहुजन समाज पार्टी)
मलबार हिल विधानसभा भेरुलाल दयालाल चौधरी (ठाकरे गट) मंगल प्रभात लोढा (भाजप)  
मुंबादेवी विधानसभा अमीन पटेल (काँग्रेस) शायना मनिष चुडासमा मुनोत (शिवसेना)  
भायखळा विधानसभा मनोज जामसुतकर (ठाकरे गट) यामिनी यशवंत जाधव (शिवसेना) फैयाज अहमद रफीक अहमद खान  (एआयएमआयएम)
शिवडी विधानसभा अजय चौधरी (ठाकरे गट)   बाळा नांदगावकर (मनसे)
वरळी विधानसभा आदित्य ठाकरे (ठाकरे गट) मिलिंद देवरा (शिवसेना) संदीप देशपांडे (मनसे)
माहीम विधानसभा महेश सावंत (ठाकरे गट) सदा सरवणकर (शिवसेना) अमित राज ठाकरे (मनसे)
वडाळा विधानसभा श्रद्धा जाधव (ठाकरे गट) कालिदास कोळंबकर (भाजप) स्नेहल सुधीर जाधव (मनसे)
सायन-कोळीवाडा विधानसभा गणेश कुमार यादव  (काँग्रेस)

कॅप्टन आर तमिल सेल्वन (भाजप)

संजय प्रभाकर भोगले (मनसे)
धारावी विधानसभा डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस) राजेश शिवदास खंदारे (शिवसेना)

मनोहर केदारी रायबागे

(बहुजन समाज पार्टी)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Politics: जळगावात Mahayuti मध्ये 'दोस्तीत कुस्ती', Bhadgaon-Pachora मतदारसंघात मित्रपक्षच आमनेसामने?
Narco Test Politics: '...तर तुरुंगात जाईन', Ranjitsinh Nimbalkar यांचे Sushma Andhare आणि Mahebub Shaikh यांना थेट आव्हान
Mumbai Infra: 'अपघात-अपघातच आहे, मॉकड्रिल नाही', मोनोरेल दुर्घटनेत कॅप्टन जखमी झाल्याचा दावा
Digital Arrest Scam: मुंबईतील ५८ कोटींच्या 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणी मोठी कारवाई, २६ जणांना अटक
Women's World Cup: 'विश्वविजेत्या' Team India ला Varanasi तील घाटावर आकर्षक रांगोळीतून मानवंदना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
Embed widget