मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या उमेदवारांची 4 थी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बीड, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील मतदारसंघातून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात येत असून सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे मनसेच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन शेअर करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. चौथ्या यादीत पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर आणि चिखली मतदारसंघातील भाजप आमदार श्वेता महाले यांच्याविरुद्ध मनसेनं उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मनसेनं आत्तापर्यंत 70 उमेदवारांची नावे जाहीर केली असून जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. तिसऱ्या यादीत मनसेनं 13 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर अन् ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर, आज चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वी, 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर, दुसऱ्या यादीतून सर्वाधिक म्हणजेच 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंविरुद्ध उमेदवार
राज ठाकरे यांनी यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्या प्रमाणं मनसेनं एकला चलोची भूमिका कायम ठेवली आहे. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल मनसेकडन 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली . आज मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. म्हणजेच मनसेकडून आतापर्यंत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंकडून अभिजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चौथी यादी खालीलप्रमाणे.... pic.twitter.com/LP8hBG0JJo
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 25, 2024
मनसेनं आज जाहीर केलेले 5 मतदारसंघातील उमेदवार
1. 215 कसबा पेठ - गणेश भोकरे
2. 23 चिखली - गणेश बरबडे
3. 276 कोल्हापूर उत्तर - अभिजित राऊत
4. 232 केज - रमेश गालफाडे
5. 175 कलीना - संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी