एक्स्प्लोर

अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते सदा सरवणकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मी माहीम मतदारसंघातून माघार घेणार नाही, असे ते म्हणाले.

मुंबईराज्यातील विधानसभा निवडणुकीत माहीम हा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या जागेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांच्या विजयासाठी महायुती प्रयत्न करणार का? असे विचारले जात आहे. तशी इच्छाही भाजपा तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र या जागेवरून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. यावरच त्यांनी आज पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. 

सदा सरवणकर काय म्हणाले? 

 सदा सरवणकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी त्यांनी मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. "मी माघार घेणार नाही. वेळोवेळी सांगितले आहे मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मला एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी एबी फॉर्म भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. अन्य कोणी माघार घेत असेल तर चौकशी करा," असे सदा सरवणकर म्हणाले. 

वर्षावर गेलो पण मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही

"दिवाळीच्या दिवशी कोणाच्या दारात जाणे, आपल्या कार्यकर्त्यांना माता भगिनींना त्यामध्ये गुंतवून ठेवणे हे मला पटत नाही. तरी सुद्धा माझ्या आज तीन चार बैठका आहेत. मी वर्षावर गेलो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही. काही छोटी-मोठी कामे असतात. आमदार म्हणून ती इतर स्टाफच्या माध्यमातून होतात. दरवेळी मुख्यमंत्र्यांना भेटणे गरजेचे नाही," असेही सरवणकर यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका

राज ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले होते. त्यावर बोलताना सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी, मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे हास्यास्पद आहे. मी त्यांच्यावर टीका करवी असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे महायुती ठरवेल," असे सरवणकर म्हणाले. 

सदा सरवणकर काय म्हणाले, पाहा व्हिडीओ :

मी माघार घेण्याचा प्रश्नच नाही

यासह "मी माघार घेण्याचा प्रश्न नाही. महायुतीमध्ये मनसे नाही. मी एकटा पडलेलो नाही. मला जनतेचे आशीर्वाद आहे. मी ठासून आणि ठामपणे सांगतो मी निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून येणार आहे. ही कार्यकरर्त्यांची इच्छा आहे. मी कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी निवडणूक लढवत आहे आणि निवडून येणार. जनता माझ्यासोबत आहे," असेही सरवणकर यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा :

Amit Thackeray: दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे

महायुतीकडून सदा सरवणकर यांना मोठी ऑफर, अर्ज माघारी घेणार?; राजकीय वर्तुळात खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesh Kshirsagar : सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
Rahul Gandhi: भिंतीचा कलर खरवडून काढला, भेगांमध्ये लांबी भरली; राहुल गांधींचा कष्टकऱ्यांसोबतच्या दिवाळीचा व्हिडीओ व्हायरल
भिंतीचा कलर खरवडून काढला, भेगांमध्ये लांबी भरली; राहुल गांधींचा कष्टकऱ्यांसोबतच्या दिवाळीचा व्हिडीओ व्हायरल
नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, तारीख अन् ठिकाण निश्चित; प्रचारसभांचा धडाका
नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, तारीख अन् ठिकाण निश्चित; प्रचारसभांचा धडाका
आमचे फोन आजही टॅप होताय, संजय राऊतांचा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप; आता भाजप नेत्याचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
आमचे फोन आजही टॅप होताय, संजय राऊतांचा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप; आता भाजप नेत्याचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Sawant on Shaina NC: मी कोणत्या महिलेचा अपमान केला नाही, अरविंद सावंतांचं स्पष्टीकरणRahul Gandhi Diwali clebration : राहुल गांधींची रंगकाम करणाऱ्यांसह दिवाळी साजरीSamrjeet Ghatge Meet Manoj Jarange : अंतरवाली सराटीत समरजीत घाटगेंनी घेतली मनोज जरांगेंची भेटsharad Pawar Party symbol : शरद पवारांची राष्ट्रवादीची मागणी मान्य, तूतारी वाजवणारा माणूस कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesh Kshirsagar : सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
सतेज पाटलांवरील आरोपांच्या चौकशीची मागणी आम्ही केली असती, तर खूप गोष्टी बाहेर आल्या असत्या : राजेश क्षीरसागर
Rahul Gandhi: भिंतीचा कलर खरवडून काढला, भेगांमध्ये लांबी भरली; राहुल गांधींचा कष्टकऱ्यांसोबतच्या दिवाळीचा व्हिडीओ व्हायरल
भिंतीचा कलर खरवडून काढला, भेगांमध्ये लांबी भरली; राहुल गांधींचा कष्टकऱ्यांसोबतच्या दिवाळीचा व्हिडीओ व्हायरल
नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, तारीख अन् ठिकाण निश्चित; प्रचारसभांचा धडाका
नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, तारीख अन् ठिकाण निश्चित; प्रचारसभांचा धडाका
आमचे फोन आजही टॅप होताय, संजय राऊतांचा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप; आता भाजप नेत्याचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
आमचे फोन आजही टॅप होताय, संजय राऊतांचा रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप; आता भाजप नेत्याचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
Prakash Ambedkar Health Update: प्रकाश आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी, कशी आहे तब्येत? माहिती आली समोर
प्रकाश आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी, कशी आहे तब्येत? माहिती आली समोर
Dr Bibek Debroy Passed Away : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
Fireworks Blast In Andhra Pradesh : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Video : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
Embed widget