एक्स्प्लोर
मी आणि अर्जुन खोतकर कधीही भांडलो नाही : रावसाहेब दानवे
मी आणि अर्जुन खोतकर कधीही भांडलो नाही, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई : मी आणि अर्जुन खोतकर कधीही भांडलो नाही, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते. जालना लोकसभेच्या उमेदवारीवरुन खोतकर-दानवे यांच्यामधील वादाची राज्यभर चर्चा झाली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दाववे यांनी उत्तर दिले. खोतकर-दानवे वादाबाबत दानवे म्हणाले की, "गेल्या काही काळात आमच्यात वाद असल्याच्या बातम्या सर्वांनी दाखवल्या, परंतु आमच्यात काहीही वाद नाहीत. आमचे पक्ष आणि आम्ही वेगळे झालो होतो, परंतु दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही एकत्र आलो." दानवे म्हणाले की, "मी आणि अर्जुन खोतकर आम्ही दोघांनी गेली 30 वर्षे जालन्याची जिल्हा परिषद सांभाळली आहे. सत्तेत नव्हतो तेव्हादेखील त्यावर आमचे नियंत्रण ठेवले. डीसीसी बँक आम्ही दोघांनी ताब्यात ठेवली. काही काळ मी डीसीसी बँकेचा चेअरमन होतो तर काही काळ खोतकर चेअरमन होते." दानवे म्हणाले की, "मी आणि अर्जुन खोतकर दोघे असताना जालन्याची सत्ता हस्तगत करण्याची कोणाचीही हिंमत नाही. भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा या पंचायत समित्या आम्ही दोघांनी ताब्यात ठेवल्या."
आणखी वाचा




















