MC Election News: 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
MC Election News: मुंबई–ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे.

MC Election News: मुंबई–ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून, 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये राज्यभरातील 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, शहरी राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
MC Election News: अनेक वर्षांपासून प्रलंबित निवडणुकांना अखेर मुहूर्त
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका गेल्या 5 ते 7 वर्षांपासून, काही ठिकाणी त्याहून अधिक काळ प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर, 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर, आता राज्यातील उर्वरित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Municipal Corporations Election Schedule: महापालिका निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र दाखल : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
उमेदवारी माघार : 2 जानेवारी
चिन्ह वाटप व अंतिम यादी : 3 जानेवारी
मतदान : 15 जानेवारी
निकाल : 16 जानेवारी
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली असून, यासोबतच जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांच्याही निवडणुका होणार आहेत.
MC Election News: 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार
या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने, त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
MC Election News: निवडणुकीशी संबंधित आकडेवारी
एकूण मतदार : 3.48 कोटी
एकूण मतदान केंद्रे : 39,147
मुंबईतील मतदान केंद्रे : 10,111
कंट्रोल युनिट : 11,349
बॅलेट युनिट : 22,000
Election Spending Limit : उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती?
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. महापालिकेच्या वर्गवारीनुसार ही मर्यादा पुढीलप्रमाणे आहे:
अ वर्ग महापालिका : 15 लाख रुपये
ब वर्ग महापालिका : 13 लाख रुपये
क वर्ग महापालिका : 11 लाख रुपये
ड वर्ग महापालिका : 9 लाख रुपये
खर्च मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.
MC Election News: मतदान पद्धत आणि उमेदवारी संदर्भातील नियम
- मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड प्रणाली असल्याने मतदाराला एकच मत द्यावे लागणार आहे.
- उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान करावे लागणार आहे.
- उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
- ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
MC Election News: मतदार जनजागृती व सुविधा
मतदार जनजागृतीसाठी रील्स आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
MC Election News: सुरक्षा व प्रशासनाची तयारी
या निवडणुकीसाठी 1 लाख 96 हजार 605 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या 48 तास आधी प्रचार व जाहिरातींवर बंदी राहणार असून, महापालिका निवडणूक नियमांनुसार ही आचारसंहिता कडकपणे अंमलात आणली जाणार आहे.
MC Election News: 29 महापालिकांमध्ये 2,869 जागांसाठी मतदान
राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये
- 1,442 महिला सदस्य,
- 759 इतर मागासवर्गीय (OBC),
- 341 अनुसूचित जाती,
- 77 अनुसूचित जमाती यांचा समावेश आहे.
Municipal Corporations Election List : कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
1. बृहन्मुंबई - 227
2. भिवंडी-निजामपूर - 90
3. नागपूर – 151
4. पुणे – 162
5. ठाणे - 131
6. अहमदनगर - 68
7. नाशिक – 122
8. पिंपरी-चिंचवड - 128
9. औरंगाबाद - 113
10. वसई-विरार - 115
11. कल्याण-डोंबिवली - 122
12. नवी मुंबई - 111
13. अकोला - 80
14. अमरावती - 87
15. लातूर - 70
16. नांदेड-वाघाळा - 81
17. मीरा-भाईंदर - 96
18. उल्हासनगर - 78
19. चंद्रपूर - 66
20. धुळे - 74
21. जळगाव - 75
22. मालेगाव - 84
23. कोल्हापूर - 92
24. सांगली-मिरज-कुपवाड - 78
25. सोलापूर - 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना - 65
28. पनवेल - 78
29. परभणी – 65




















