एक्स्प्लोर
Advertisement
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघ | अबू आझमींविरोधात शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे आणि अलीम खान यांच्याकडून मोर्चेबांधणी
सपाचा मुंबईतील चेहरा म्हणजे अबू आझमी. साल 2009 आणि 2014 मध्ये मानखुर्द-शिवाजीनगरमधून ते मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. परंतु सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अबू आझमी कायम चर्चेत आणि वादात असतात. असं असलं तरी या मतदारसंघावर त्यांची अतिशय मजबूत पकड आहे, हे मात्र नक्की.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्याने हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्याचा परिणाम थेट मतांच्या आकडेवारीवरही झाला होता. त्यावेळची या दोन्ही पक्षांना मिळालेली मतं आणि युतीत लढलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पडलेली मतं पाहता मुंबई आणि उपनगरातील 36 विधानसभांपैकी 21 मतदारसंघांमध्ये युतीच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे, तर 14 मतदारसंघांत युतीची मतं घटल्याचा अहवाल आहे. मात्र दोन मतदारसंघांमध्ये जवळपास मागच्या एवढीच मतं मिळाली आहेत. त्यातील एक मतदारसंघ आहे तो मानखुर्द शिवाजीनगरचा.
उत्तर-पूर्व मुंबईत नवी मुंबईच्या वेशीवर असलेला मतदारसंघ म्हणजे मानखुर्द-शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ. उत्तर-पूर्वमधल्या इतर मतदारसंघांच्या तुलनेत मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय मतदारांचं प्रमाण मोठं आहे. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्टी असल्यामुळे इथल्या नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केलं आहे. देवनारचा कत्तलखाना आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडचा वर्षानूवर्षे प्रलंबित असलेला मुद्दा अजूनही सुटू शकलेला नाही. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या इथं फारच मोठ्या प्रमाणात आहेत. हा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी आरक्षित असला तरी प्रामुख्याने मुस्लीम मतदार इथं मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणूनच अल्पसंख्यांक आणि अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणारी जनता हीच या मतदारसंघाची मुख्य ओळख झाली आहे. या सर्व परिस्थितीच्या जोरावर आणि अल्पसंख्यांकाच्या हुकमी कार्डावर समाजवादी पक्षाने (सपा) इथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
सपाचा मुंबईतील चेहरा म्हणजे अबू आझमी. साल 2009 आणि 2014 मध्ये मानखुर्द-शिवाजीनगरमधून ते मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. परंतु सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अबू आझमी कायम चर्चेत आणि वादात असतात. असं असलं तरी या मतदारसंघावर त्यांची अतिशय मजबूत पकड आहे, हे मात्र नक्की.
भाजपने फारसा जोर न लावल्याने शिवसेना हाच इथं दुसऱ्या पसंतीचा पक्ष राहिला आहे. शिवसेनेने नुकताच पक्षप्रवेश दिलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि एकेकाळचे कट्टर राणे समर्थक विठ्ठल लोकरे यांनी इथं भावी आमदार म्हणून मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकरे हे सलग तीनवेळा इथून मुंबई महानगर पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा इथून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. असे असले तरी शिवसेनेचे बेहरामपाडा येथील नगरसेवक हाजी अब्दुल अलीम खानही आता मानखुर्द शिवाजीनगर इथून आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तेव्हा आता शिवसेना कोणाच्या गळ्यात माळ घालते? स्थानिक नगरसेवकपदाचा उमेदवार की इथल्या मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी जवळचा मुस्लिम नगरसेवक यावर त्यांचं अबू आझमींच्या विरोधातील लढतीचं भवितव्य अवलंबून आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी
1. अबू आझमी, सपा – 41,719
2. सुरेश पाटील, शिवसेना – 31,782
3. अब्राहनी युसूफ, काँग्रेस – 27,494
4. राजेंद्र वाघमारे, राष्ट्रवादी – 5,632
5. अल्ताफ काजी, एमआयएम – 4,505
नोटा – 1,338
मतदानाची टक्केवारी – 41.33%
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement