एक्स्प्लोर

Mangalwedha Election: अखेर मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर, 20 डिसेंबरला मतदान; यवतमाळबाबतही मोठी अपडेट

Mangalwedha Election: मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया अखेर नव्या तारखांसह जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे.

Mangalwedha Election: मंगळवेढा नगरपरिषद (Mangalwedha Nagarparishad Election) तसेच नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर नव्या तारखांसह जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांमुळे अडकलेली निवडणूक आता 20 डिसेंबर रोजी होणार असून, राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.

मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जांवर एकूण तीन अपील जिल्हा न्यायालयात दाखल झाली होती. या अपिलांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्याने निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. पूर्वीच्या कार्यक्रमानुसार मतदान 2 डिसेंबरला आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती. मात्र न्यायालयीन अडथळ्यांमुळे संपूर्ण कार्यक्रम रद्द करावा लागला.

Mangalwedha Election: निवडणूक आयोगाचा नवा निर्णय

निर्णयाची प्रतीक्षा आणि संभ्रम निर्माण झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवेढा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसंदर्भात नवा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी हा निर्णय जाहीर केला. सहआयुक्त योगेश डोके यांनीही या कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Mangalwedha Election: सुधारित निवडणूक कार्यक्रम

नवीन वेळापत्रकानुसार पुढीलप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

4 डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.

10 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.

11 डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.

20 डिसेंबर: मतदान.

21 डिसेंबर 2025: मतमोजणी.

23 डिसेंबरपूर्वी: संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

Mangalwedha Election: निवडणुकीला नव्या वेळापत्रकानुसार सुरूवात 

नव्या कार्यक्रमामुळे मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत पुन्हा उत्साह येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब आता मागे पडला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबरपूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसून येते. 

Yavatmal Election: यवतमाळ नगरपरिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

दरम्यान, यवतमाळ नगरपरिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या, तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक 20 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Ahilyanagar Election: अहिल्यानगरमधील निवडणुका पुढे ढकलल्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.  कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया ढकलणार आहेत. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबरपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहेत. 

Dharashiv Election: धाराशिव नगरपालिकेसाठी सुधारित कार्यक्रम

न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे स्थगित झालेल्या धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) अखेर सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर केला. चार दिवसांपूर्वी या जागांवरील निवडणुकांना स्थगिती लागू करण्यात आली होती. त्यामुळे उमेदवार, प्रशासन व नागरिकांचे लक्ष या सुधारित कार्यक्रमाकडे लागले होते. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे बाधित झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे 

4 डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.

10 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.

11 डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.

20 डिसेंबर: मतदान.

21 डिसेंबर 2025: मतमोजणी.

आणखी वाचा

Nagarparishad Election: मोठी बातमी: अवघे काही तास शिल्लक असताना 'या' तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Embed widget