एक्स्प्लोर

Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...

Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नये. हा भाजपचा डाव आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी (West Bengal Election Result 2026) सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भाजप 193 आणि तृणमूल काँग्रेसने 94 जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित होत असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026)

भवानीपूर मतदारसंघातील टीएमसीच्या उमेदवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नये. हा भाजपचा डाव आहे. मी कालपासूनच हे सांगत आहे की, सुरुवातीला त्यांनाच आघाडीवर असल्याचे दाखवले जाईल. त्यांनी अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली आहे. कल्याणी येथे अशा काही मशीन्स आढळल्या आहेत, ज्यांमधील आकडेवारी जुळत नाही. केंद्रीय दलांच्या माध्यमातून सर्व बाजूंनी टीएमसीवर दबाव आणले केले जात आहेत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

निराश होण्याची काहीच गरज नाही; सूर्यास्तानंतर तुमचाच विजय- ममता बॅनर्जी (Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026)

'SIR' (निवडणूक यंत्रणा) च्या माध्यमातून त्यांनी मते चोरण्याचा प्रयत्न केला, तरीही सध्या आम्ही 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहोत. ज्याची मात्र कुठेही नोंद घेतली जात नाहीये. सर्व काही चुकीच्या पद्धतीनेच प्रसिद्ध केले जात आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे आपल्या मर्जीनुसार काम करत आहे आणि केंद्रीय दलेही त्यांनाच साथ देत आहेत. स्थानिक पोलीसही केंद्रीय दलांच्याच सोबतीने काम करत आहेत. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगते की, निराश होण्याची काहीच गरज नाही; सूर्यास्तानंतर तुमचाच विजय होईल. मतमोजणीच्या केवळ 2-4 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, ही प्रक्रिया 14 ते 18 फेऱ्यांपर्यंत चालते आणि अंतिमतः आपलाच विजय होईल. कुणीही घाबरण्याचे काहीच कारण नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

प.बंगालच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये- (West Bengal Election Result 2026)

  • भाजपकडून आणखी एक राज्य प्रथमच पादाक्रांत
  • ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवली
  • 10 वर्षातच भाजपची 3 वरुन जवळपास 200 जागांवर मजल
  • 2021 च्या तुलनेत भाजपची मतांची टक्केवारी 38.15% वरुन 44.77%
  • तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 48.02% वरुन 41.52% पर्यंत घट

संबंधित बातमी:

Election Result 2026: बंगालपासून, आसाम, केरळ, तामिळनाडू, बारामती, राहुरीपर्यंत....; कुठे कोणाची सत्ता, पहिल्या 2 तासांत हादरवणारे कल, संपूर्ण निकाल एका क्लिकवर

West Bengal Election Result 2026: मतदान केल्यानंतर गप्प राहिल्या, आता भाजपने बंगालमध्ये मुसंडी मारताच महिला धडाधड बोलू लागल्या, ममता बॅनर्जींना सुनावलं, पश्चिम बंगालमध्ये काय काय घडतंय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget