Malshiras Election 2024 : बॅलेट पेपरवरील मतदान बेकायदेशीर, मारकडवाडी येथील फेर मतदानाची मागणीबाबत प्रशासनाचा निर्णय
Malshiras Vidhan Sabha Election 2024 : मारकड वाडी (Markadwadi) ग्रामस्थांनी केलेली फेर मतदानाची मागणी गैरवाजवी असून कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
Malshiras Assembly constituency: मारकड वाडी (Markadwadi) ग्रामस्थांनी केलेली फेर मतदानाची मागणी गैरवाजवी असून कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे ती याचिका फेटाळून लावण्यात आल्याचे माळशिरसच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले आहे. आता मतदान आणि मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे . मात्र ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करताना प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसवून केलेली आहे. मारकडवाडी येथे झालेले मतदान अथवा मतमोजणी ही सर्व संबंधित प्रतिनिधींच्या समोर करण्यात आलेली असून मतदानाच्या वेळी अथवा मतमोजणीच्या वेळी कोणताही आक्षेप यांनी घेतलेला नसल्याने आता केलेली मागणी बेकायदेशीर असल्याची भूमिका माळशिरस विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी घेतली आहे.
बॅलेट पेपर आणि मतदानाबाबत ग्रामस्थांच्या भूमिकेकडे लक्ष
मारकड वाडी गावाने प्रशासनाकडे चाचणी मतदान किंवा एक्झिट पोल घेण्यासाठी प्रशासनकीय मदत मागितली होती. अशा पद्धतीचे चाचणी मतदान हे निवडणूक कालावधीत घ्यावे लागते, ज्या पद्धतीने त्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची भूमिका घेतली आहे ती कायदेशीर नाही, असा खुलासा ही माळशिरस विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी केला आहे. प्रशासनाच्या खुल्यासानंतर ग्रामस्थांची सध्या बैठक सुरू असून आता मंगळवारी होणाऱ्या बॅलेट पेपर आणि मतदानाबाबत ग्रामस्थ काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. प्रशासनाने मात्र ही सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांचे अर्ज फेटाळून लावले आहेत.
महाराष्ट्रात सगळीकडं आक्रोश : नाना पटोले
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश आलेलं आहे तो लाडक्या बहिणींचा प्रभाव नव्हता. हा सगळा प्रभाव निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनीही मिळून केलेल्या पापाचे फळ आहे. महाराष्ट्रात जनतेचं सरकार नं येता निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलेलं भाजपचं सरकार येतंय. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आक्रोश आहे. लोकं सरकार आमचं आहे, असं म्हणायलाच तयार नाही. भाजपवाल्यांचे चेहरे पाहिले तरी त्यांनाही असं वाटतंय की, आम्ही तर मतदान मारलंचं नाही, हे सरकार आलं कुठून? भाजपवाल्यांच्या मनातही हीच परिस्थिती असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. आता नाना पटोले यांच्या टीकेवर भाजप काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या