एक्स्प्लोर
Advertisement
एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेस चालेल, मात्र काँग्रेसबाबत आक्षेप : राज ठाकरे
राष्ट्रवादी काँग्रेसची साथ एकवेळ चालेल मात्र काँग्रेसबाबत थोडे आक्षेप आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. परंतु काँग्रेसबाबतचे आक्षेप मात्र त्यांनी सांगितलं नाही. मी कोणाकडेही युती, आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो, आताही गेलो नाही, असंही ते म्हणाले
मुंबई : कोणासोबत जायचं हे ठरवायचा निर्णय घ्यायची वेळ आली तर राष्ट्रवादी चालेल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. परंतु सध्या माझा असा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची साथ एकवेळ चालेल मात्र काँग्रेसबाबत थोडे आक्षेप आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. परंतु काँग्रेसबाबतचे आक्षेप मात्र त्यांनी सांगितलं नाही. मी कोणाकडेही युती, आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो, आताही गेलो नाही, असंही ते म्हणाले
विरोधी पक्षासाठी मतं का?
शिवसेना आणि भाजपवर अंकुश ठेवणं ठेवणारं कोणी नाहीय. त्यामुळे ही जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. भारताच्या इतिहासात विरोधी पक्षासाठी म्हणून मतं कोणी मागितली नसतील. लोकांच्या मनातला राग व्यक्त करायचा कोणी, त्यामुळे मला ही जबाबदारी घ्यावी असं वाटलं. आज मी घेतलेली भूमिका अत्यंत प्रॅक्टिकल, योग्य आहे. महाराष्ट्राच्या गरेजसाठी घेतलेली भूमिका आहे. राज्याला सध्या विरोधी पक्षाची गरज आहे. गेल्या पाच वर्षात विरोधी पक्षाचं अस्तित्त्वच नव्हतं.
आजही ईव्हीएमला विरोध : राज ठाकरे
माझा आजही ईव्हीएमला विरोध आहे पण करणार काय? कारण त्याबाबत संभ्रम आहे. आज माझे उमेदवार निवडून येतीलही पण बॅलेट पेपरचा आग्रह गैर काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. जपान, नेदरलँड या ठिकाणी बॅलेट पेपरवर व्होटिंग होतं. मग आपण ईव्हीएम का करत आहोत? मी कोणाला मत दिलं आहे ते मला कळलं पाहिजे ही मागणी मी करतो आहे, त्यात चुकीचं काय? मला अपेक्षित असलेली मतं मिळाली, माझे उमेदवार निवडून आले तर मी समजेन की सरकार बेसावध राहिलं.
लाव रे तो व्हिडीओ, ईडी नोटीस आणि आघाडी
लोकसभा निवडणुकीवेळी 'लाव रे तो व्हिडीओ'मुळे तुम्हाला ईडीची नोटीस आली, परंतु तरीही विरोधी पक्षांनी तुम्हाला सोबत घेतलं नाही, याबाबत राज ठाकरे म्हणाले की, "मी लोकसभेच्या वेळीही सांगितलं होतं की, मी कुणाकडेही युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो नाही. आता विधानसभा निवडणुकीच्यावेळीही मी कोणाहीकडे युतीचा प्रस्ताव मांडला नाही. सोनिया गांधींना भेटलो तेव्हा पहिलं वाक्य होतं मी आघाडीसाठी आलेलो नाही, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसाठी आलोय. युती, आघाडीसोबत जावं असं मला वाटत नाही," असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
ईडी नोटीसला भीक घालत नाही?
"ईडीची नोटीस हा सगळा व्यवहार आहे. माझे हात दगडाखाली असते ना तर मी यांच्या अंगावर जाण्याची हिंमतही केली नसती. मी ईडीच्या नोटीसला भीक घालत नाही. चौकशांना मला फरक पडत नाही. निवडणुकीच्या तोंडावर यांना शरद पवार आठवले, अजित पवार आठवले, आता ईडीलाही राजकारण जमू लागलं का? त्यांना जे काय करायचंय ते करु शकतात, निष्पन्न काही होणार नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
व्हिडीओ का मिसिंग आहेत?
व्हिडीओ का मिसिंग आहेत? असं विचारलं असता, सारखं सारखं तेच तेच प्रकार का करायचे? प्रचाराला काही वेळा वाटलं तर व्हिडीओ काढेन, ते लपवून ठेवलेले नाहीत. अजून आठ दिवस आहेत, त्यामुळे मिळेल काहीतरी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement