Mahayuti Oath Ceremony: ठरलं एकदाचं! उद्या आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी; परिसरातील वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Mahayuti Oath Ceremony Azad Maidan: मुंबईच्या आझाद मैदानात महायुतीच्या भव्यशपथविधी सोहळ्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नेमके पर्याय कोणते आहेत, जाणून घ्या सविस्तर
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास आठवडाभर उलटून गेला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला असला तर अद्याप मंत्रीपदाबाबतचा पेच कायम असल्याचं चित्र होतं. उद्या (गुरूवारी) राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा आणि काही मंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा सुरू असून महायुती सरकारचा (Mahayuti Government) शपथविधी नेमका कधी आणि कुठे होणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी मोठी तयारी केली जात आहे. शपथविध सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षितता आणि इतर गोष्टींमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतूक मार्गात बदल
1) आझाद मैदान परिसरात पार्किगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शपथविधी कार्यक्रमाकरीता येणाऱ्या जन समुदायाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा (विशेषतः रेल्वेचा / लोकल ट्रेनचा) वापर करावा.
2) वाहनांना प्रवेश बंद. (आवश्यकतेनुसार).
अ. महानगरपालीका मार्गः छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत दोन्ही वाहीन्या.
पर्यायी मार्ग:- एल. टी. मार्ग चकाला जंक्शन उजवे वळण-डि. एन रोड छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) इच्छित स्थळी मार्गस्थ. तसेच उलटपक्षी (Vice-versa)
ब. महात्मा गांधी रोडः चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत दोन्ही वाहीन्या इच्छित स्थळी मार्गस्थ.
पर्यायी मार्ग:-1) एल. टी. मार्ग चकाला जंक्शन उजवे वळण-डि. एन रोड सी.एस. एम. टी.
इच्छित स्थळी मार्गस्थ. तसेच उलटपक्षी (Vice-versa).
2) वाहतुक महर्षि कर्वे रोडने (एम. के. रोड) ने इच्छित स्थळी मार्गस्थ.
क. हजारीमल सोमानी मार्ग:- चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) पर्यंत वाहतुक प्रतिबंधित असेल.
पर्यायी मार्ग:- चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक-काळा घोडा के दुभाष मार्ग - शहिद भगतसिंग मार्गाने ईच्छित स्थळी मार्गस्थ.
ड. प्रिसेंस स्ट्रिट ब्रिज (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड तसेच कोस्टल रोडने
श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक)
पर्यायी मार्ग:- सदरची वाहतूक एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येईल.
इ. रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) रामभाऊ साळगांवकर रोडवरील इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गीका दुपारी १२.०० वा. ते २०.०० वा पर्यंत खुली करण्यात येत आहे.
3) या दिवशी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आझाद मैदान व छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस एम टी) परिसरात येणार असल्याने नागरिकांनी आपला प्रवास त्या अनुषंगाने नियोजित करावा.