एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: भायखळा मतदारसंघाचा मविआतील तिढा सुटला, ठाकरेंचा शिलेदार लढणार, मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव असा सामना रंगणार

Byculla Assembly Election : भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शिंदेंच्या शिवसेनेत लढत होईल. मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत होणार आहे.

मुंबई : भायखळा विधानसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीतला तिढा सुटला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मनोज जामसुतकर यांना भायखळा विधानसभा मतदारसंघातून (Byculla Assembly Seat) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळं या मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमने सामने येणार आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेककडून मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) रिंगणात आहे.


भायखळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे.  मनोज जामसुतकर यांना शिवसेना ठाकरे गटातून  भायखळा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. ठाकरेंकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.   महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील दोन जागा संदर्भात अजूनही तिढा कायम असताना त्यातील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा चित्र आहे 

शिवसेना ठाकरे गटाकडून भायखळा विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक उपनेते मनोज जामसुतकर यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. मनोज जामसुतकर सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने सुद्धा दावा सांगितलेला असताना अखेर हा तिढा सुटल्याचं सांगण्यात आलंय. 

मनोज जामसुतकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. आशिष चेंबुरकर यांनी साथ दिली. उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवत भायखळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि मविआनं जो विश्वास दाखवला आहे त्याला न्याय देत आमदार म्हणून निवडून येणार असल्याचं जामसुतकर म्हणाले. 

मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव असा सामना भायखळा विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात ही लढत होणार आहे. 

आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा असा सामना 

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आदित्य ठाकरे उमेदवार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे देखील रिंगणात आहेत. त्यामुळं या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

संजय राऊत यांच्याकडून महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात भेटी गाठी सुरु आहेत. संजय राऊत सध्या शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मविआत काही जागांवर  अद्याप तोडगा निघालेला नाही. त्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती मिळतेय.

इतर बातम्या: 

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, भाजप आमदाराला दिल्लीतून फोन; नाशिक पोलिसांनी घेतला शोध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget