राजीनामा देऊनही माझ्यावर कारवाई का? कारवाई करणाऱ्याला घटना माहित नसेल काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारेंचा सवाल
काँग्रेसचा मी दिला आहे, तरीही माझ्यावर का कारवाई केली हे माहीत नाही. कारवाई करणाऱ्याला घटना माहिती नसेल, असे वक्तव्य कसबा विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे यांनी केलं.
Kamal vyavhare : काँग्रेस पक्षाचा मी रीतसर राजीनामा दिला आहे, तरीही माझ्यावर का कारवाई करण्यात आली माहीत नाही. कारवाई करणाऱ्याला घटना माहिती नसेल, अशी टीका कसबा विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे (kamal vyavhare) यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर 6 वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच (Mahavikas Aghadi) बंडखोरी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. अशातच ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्या सर्व उमेदवारांवर कारवाई होणार असल्याचे माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच कोल्हापूर उत्तरमध्ये आम्ही राजेश लाटकर यांना पाठिंबा दिल्याचे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसने 'या' उमेदवारांवर केली कारवाई
ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्याला आता खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जाहीर पाठिंबा दिला. आता जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनावर जयश्री पाटील काय म्हणाल्या?
सांगली विधानसभेत जयश्रीताई पाटील यांनी देखील बंडखोरी केली आहे. त्यांच्यावर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई केली आहे. यावर बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, वसंतदादा घराण्याने काँग्रेससाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षानेही आम्हाला पदे दिली आहेत. मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले. पण गेल्या काही वर्षात वसंतदादा घराण्याला डावण्याचे काम पक्षातील काही मंडळींनी केले. यंदाही मी मेरिटवर पक्षाची उमेदवारी मागितली होती. पण ऐनवेळी षडयंत्र करून माझी उमेदवारी डावलली गेली. महाआघाडीचे घटक असलेले खासदार विशाल पाटील यांनी माजी उमेदवारी महाआघाडीचीच असल्याचे जाहीर केली आहे. त्यामुळे मी महाआघाडीचीच अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवीत आहे. एक महिला उमेदवार म्हणून मला पाठिंबाही मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: