मी दोनदा आमदार गोट्या खेळून झालो नाही, शरद पवारांच्या 'त्या' गद्दारीची परतफेड करणार, सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
शरद पवार साहेब तुमच्या या गद्दारीची परतफेड या शिराळा मतदारसंघातील जनता केल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Kho) यांनी शरद पवारांवर केला.
Sadabhau Khot on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवाजीराव देशमुख (Shivajirao Deshmukh) सभापती असताना त्यांच्या आजापणाच्या काळामध्ये अविश्वासाचा ठराव आणला होता. पवार साहेब तुमच्या या गद्दारीची परतफेड या शिराळा मतदारसंघातील जनता केल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Kho) यांनी शरद पवारांवर केला.
शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख सभापती असताना त्यांच्या आजारपणात अविश्वासाचा ठराव आणला होता . पवारसाहेब ही तुमची गद्दारी आहे आणि त्या गद्दारीची परतफेड या शिराळा मतदार संघातील जनता केल्याशिवाय राहणार नाही असे सदाभाऊ खोत म्हणाले. सांगलीच्या शिराळा येथे महायुतीतील भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. त्यावेळी देशमुख साहेब म्हणत होते मी आजारी आहे. शेवटच्या पायरीवर उभा आहे. मी राजीनामा स्वतःहून देतो, माझा तुम्ही अपमान करु नका. मला काहीही नको आहे थोडं मला बरे होऊ द्या. मी चालत त्या सभागृहात येतो माझा सभापती पदाचा राजीनामा देत असे शिवाजीराव देशमुख म्हणत होते असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना खोतांचा इशारा
इथं आपणच गुंड आहोत आणि कोणी जर आरोप करत असेल तर आपल्याकडे नऊ नंबरच्या नांगराचा फाळ आहे, तो जमिनीत एवढा घुसवू की फाटल्या शिवाय राहणार नाही,अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासह नेत्यांना इशारा दिला. गुंडागर्दी काही नाही, मी दोनदा आमदार गोट्या खेळून झालो नाही असे खोत म्हणाले. गृहमंत्री महायुतीचा असून गुंडा गर्दी झाली तर त्याची खैर नाही अशा शब्दात असे खोत म्हणाले.
राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे, कारण या पाच वर्षात राज्यात वेगळीच राजकीय समीकरणे झाली आहेत. ज्या पक्षांनी 2019 च्या निवडणुका एकमेकांच्याविरोधात लढल्या, तेच पक्ष आज सोबत आले आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे या दोन्ही पक्षातील दोन्ही गट एकमेकांविरुद्ध लढत आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार संघातील लढतीमध्ये रंगत आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक आणि भाजपाचे सत्यजित देशमुख यांच्यात लढत असणार आहे.
महत्वाच्या बातम्या: