Maharashtra Vidhansabha Election 2024 Result : पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम तर कसब्यातून रवींद्र धंगेकर पिछाडीवर
Maharashtra Vidhansabha 2024 Result : राज्यातील काँग्रेसचे दोन मोठे नेते पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत..

Maharashtra Vidhansabha 2024 Result : महाराष्ट्र विधानसभेचे पहिले कल हाती येत आहेत. पहिले काही कल पाहाता, काँग्रेसचे दोन नेते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सांगलीत फायरब्रँड नेते विश्वजीत कदम पिछाडीवर आहेत. तर पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर देखील पिछाडीवर आहेत. कसब्यातून रवींद्र धंगेकर यांच्या विरोधातील उमेदवार भाजपचे हेमंत रासने हे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे विश्वजीत कदम यांच्याविरोधातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हे सुरुवातीचे काही कल आहेत..या शिवाय काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात देखील पहिले काही कल हाती आल्यानंतर पिछाडीवर आहेत.
कसबा विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने तिसऱ्या फेरीत ५८०० मत्तांनी आघाडीवर
काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर पिछाडीवर




















