17 प्रकल्प राज्यातून बाहेर गेले, मुख्यमंत्री म्हणाले मोठा प्रकल्प देऊ पण त्यांनी भोपळा दिला, जयंत पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्र गुजरातला आंदण देण्याचं या लोकांनी ठरवलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एवढे घाबरतात की गुजरातला प्रकल्प गेला की काहीही बोलत नाहीत, असं म्हणत जयंत पाटील यांनी टीका केली.
Jayant Patil : सर्व महाराष्ट्र गुजरातला आंदण देण्याचं या लोकांनी ठरवलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एवढे घाबरतात की गुजरातला प्रकल्प गेला की काहीही बोलत नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीका केली. 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलले मोठा प्रकल्प देऊ, त्यांनी भोपळा दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. काहीही केलं तरी हे माना खाली घालून बसतात असंही ते म्हणाले.
सगळ्या वस्तू महाग करण्याचं सरकारने ठरवलं आहे असे जयंत पाटील म्हणाले. सीएसटीमुळे भरपूर कर सर्व सामान्य जनतेला भरावा लागतो असेही पाटील म्हणाले. तुम्ही म्हणाल त्या वस्तूवर यांनी कर लावला आहे असे पाटील म्हणाले. गरिबांकडून सर्वात जास्त कर वसूल होतो असेही पाटील म्हणाले.
महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा वाटा 15 टक्क्यांवरुन 13 टक्क्यांवर आला
पहिल्यांदाचं असं झालं आहे की महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा वाटा 15 टक्क्यांवरुन 13 टक्क्यांवर आला आहे. 2 टक्के म्हणजे काही लाख कोटी असे जयंत पाटील म्हणाले. मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असायचा असेही जंयत पाटील म्हणाले. गुजरातचा माणूस हा जास्त श्रीमंत झाला आणि महाराष्ट्रचा माणूस थोडा मागे गेला आहे. उद्योग बाहेर जाताना हे तोंडातून शब्द देखील बाहेर काढत नाहीत. केंद्रात राज्य असलं तरी दुजाभाव केला जातो असेही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: