पैशात लोळणाऱ्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार? मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका
CM Eknath Shinde : सोन्याचा चमचा व पैशात लोळणाऱ्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार? असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
CM Eknath Shinde : 2014 ते 2019 काळात सुरू झालेले प्रकल्प अनेक बंद पाडले होते. ते प्रकल्प आम्ही मार्गी लावल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केल. लाडक्या बहिण योजनेला विरोध केला आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना व पैशात लोळणाऱ्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार? असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आम्ही 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे असेही ते म्हणाले. मी बोलतो ते करून दाखवतो. शेतकरी कर्जमाफी करून दाखवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वीचं सरकार हप्ते घेणार सरकार होतं. हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारं होतं असे म्हणत त्यांनी टीका केली. लोकसभेच आपण गाफील राहिलो, तसं गाफील राहू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हे सरकार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे
हे सरकार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे. 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. आधीच्या सरकारनं किती दिली? फक्त 4 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 350 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आधीच्या सरकारनं फक्त 4 कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी, तुमच्या आणि आमच्या कामाचे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
CM म्हणजे कॉमन मॅन
CM म्हणजे कॉमन मॅन असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. शहराचा गावाचा विकास झाला पाहिजे. रस्ते झाले पाहिजेत. रोटी कपडा आणि मकान देण्याचं काम आपलं सरकार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. लाडक्या बहिणींच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम आम्ही करत आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण वर्षाला शेतकऱ्यांना 12000 रुपये देत आहोत आता 15000 देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता विरोधकांनीही महालक्ष्मी योजना काढली आहे. एकीकडे या योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे म्हणायचे महिन्याला 3000 देऊ. सरकारकडे पैसे नाहीत म्हणता मग तुम्ही 92 हजार कोटी रुपये कुठून आणणार? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. इतर राज्यात यांनी फसवलं. करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
मी जर कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिलो नसतो तर 50 आमदार सत्तेवर लाथ मारुन आले नसते. त्यामध्ये 8 मंत्री होते. कारण धनुष्यबाण वाचवायचा होता, बाळासाहेबांचे विचार वाचवायचे होते असे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण त्यांनी विकून टाकला असता. आम्ही शिवसेना वाचवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 32 देशांनी आमच्या उठावाची नोंद घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.