राज ठाकरेंच्या भावना भाजपसोबत, चंद्रशेखर बानकुळेंचं वक्तव्य, म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री पदासाठी नाहीतर 14 कोटी जनतेसाठी निवडणूक लढवतोय
काहीवेळा राज ठाकरेंनी वेगळ्या भूमिका घेतल्या. मात्र, राज्याच्या पुढच्या विकासासाठी ते आमच्यासोबत आहेत असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं.
Chandrashekhar Bawankule : राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या शैलीने बोलतात. त्यांनी कोणाला टोला मारला त्याबद्दल बोलणं योग्य नाही, त्यांनी आपली भूमिका व्यवस्थित मांडली आहे. एखाद्यावेळी राज ठाकरे यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या. मात्र, राज्याच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीने राज साहेब आमच्यासोबत आहेत असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. राज ठाकरे यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडली आहे आणि त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील जनता निकाल ठरवेल, राज ठाकरे यांच्या भावना सुरुवातीपासून भाजपसोबत आहेत असं बावनकुळे म्हणाले.
आम्ही मुख्यमंत्री पदाकरिता निवडणूक लढत नाही. तर राज्यातील 14 कोटी जनतेसाठी आम्ही निवडणूक लढवतोय असं बावनकुळे म्हणाले. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला सर्वपक्षीय नेत्यांना या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना बावनकुळेंनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.या महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी सर्व मिळून काम करुया अशी अपेक्षा करतो.
मनोज जरांगे यांचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन
मनोज जरांगे यांचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे. या सामाजिक आंदोलनाला राजकारणाशी जोडू नये असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केलं. सत्तेमधून समाजाला न्याय मिळतो, आमचे सरकार सर्वांनाच न्याय देते असेही बावनकुळे म्हणाले. परवा आमची रात्री बैठक झाली. देवेंद्रजी आणि राज्यातील निवडणूक संचालक समितीची ती बैठक होती. जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. एका ठिकाणी एकच उमेदवार निवडणूक लढू शकतो असे बावनकुळे म्हणाले.
बंडखोरांवर कारवाई होणार
भाजपचे सर्व पदाधिकारी ज्यांनी नामांकन केलेला आहे, त्यांना आमचं आवाहन आहे की त्यांनी उमेदवारी मागे घ्याव्या आमच्या सूचनाचं पालन पदाधिकाऱ्यांनी करावं असे बावनकुळे म्हणाले. पक्ष हा आईसारखा आहे, त्यामुळे पक्षावर श्रद्धा ठेवून पक्ष सर्वांचे भलं करेल. ज्यांनी अर्ज भरले त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, ज्यांनी उमेदवारी मागे घेतल्या नाहीत त्यांच्यावर पक्ष 100 टक्के कारवाई करेल असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
सकाळचे टोमणे बंद करा, आता कोणी ऐकत नाही
रवी राजा भाजपात येताहेत. पक्षात कुठल्याही नेतृत्वाचा फायदा होतो. पक्ष वाढीसाठी त्यांचा फायदा होतो असेही ते म्हणाले. सकाळचे टोमणे बंद करा, आता कोणी ऐकत नाही असे म्हणत नाव न घेता बावनकुळेंनी राऊतांना टोला लगावला. शरद पवारांचा काय अजेंडा आहे? उद्धवजींचा अजेंडा काय आहे? काँग्रेसचा जाहीरनामा काय आहे? काय देणार जनतेला? असे सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केले. लाडकी बहीण योजना बंद करायला निघाले आहेत. वीज बिल शून्य करणार आहोत. तुमचा अजिंठा काय याबद्दल बोला असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यासोबत सुरुवातीपासून मैत्रीपूर्ण लढती आहेत असंही ते म्हणाले.