Nashik Assembly Election Results 2024 : नाशिकमध्ये मविआला मोठा धक्का, 13 जागांवर महायुतीची हवा, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? जाणून घ्या एका क्लिकवर
Nashik Assembly Election Results 2024 : आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून 15 जागांपैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
Nashik Assembly Election Results 2024 : नाशिक जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ येतात. यात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकमधील 15 मतदारसंघात एकूण 196 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून 15 जागांपैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर केवळ दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. जाणून घेऊयात कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर?
1. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ
महायुतीचे राहुल ढिकले (भाजप)- 7340
महाविकास आघाडीचे गणेश गीते (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) - 3432
राहुल ढिकले आघाडीवर
2. कळवण विधानसभा मतदारसंघ
नितीन पवार 14967
जेपी गावित 19389
महाविकास आघाडी माकपचे जेपी गावीत 4422 मतांनी आघाडीवर
महायुती अजित पवार गटाचे नितीन पवार पिछाडीवर
3. येवला विधानसभा मतदारसंघ
7 व्या फेरी अखेर महायुतीचे छगन भुजबळ 8 हजार 700 मतांनी आघाडीवर
महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे पिछाडीवर
4. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ
दहावी फेरी
दिनकर पाटील मनसे - 22000
सीमा हिरे भाजप- 44968
सुधाकर बडगुजर ठाकरे गट - 25056
भाजपच्या सीमा हिरे 19912 मतांनी आघाडीवर
5. मालेगाव मध्य विधानसभा.
सहावी फेरी
एजाज बेग:- 163
आसिफ शेख:- 6313
मौलाना मुफ्ती इस्माईल:- 3663
शान ए हिंद :- 610
16603 मतांनी आसिफ शेख हे आघाडीवर
6. बागलाण विधानसभा मतदारसंघ
पाचवी फेरी अखेर
दीपिका चव्हाण 7178
दिलीप बोरसे 38767
पाचव्या फेरी अखेर भाजप महायुतीचे दिलीप बोरसे 31, 589 मतांनी आघाडीवर...
7. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ
आठवी फेरी
अद्वय हिरे :- 1479
दादा भुसे :- 7122
बंडूकाका बच्छाव :-2697
34615 मतांनी दादा भुसे हे आघाडीवर...
8. नांदगाव विधानसभा मतदारसंघ
- सहाव्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार सुहास कांदे 27400 मतांनी आघाडीवर..
- अपक्ष उमेदवार समीर भुजबळ पिछाडीवर...
- समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत केली होती नांदगाव मधून अपक्ष उमेदवारी....
9. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ
नरहरी झिरवाळ- 44551
सुनीता चारोस्कर- 26820
सुशीला चारोस्कर- 3067
संतोष रेहरे-2524
नरहरी झिरवाळ 17731 मतांनी आघाडीवर
10. देवळाली विधानसभा मतदारसंघ
राजश्री अहिररांव 16925
सरोज अहिरे 35402
घोलप 11057
सरोज आहिरे यांना सातव्या फेरी अखेर 18 हजार 477 मतांनी आघाडीवर
11. सिन्नर विधानसभा मतदारसंघ
दहावी फेरी अखेर
आमदार माणिकराव कोकाटे 23, 876 मतांनी आघाडीवर
शरद पवार गटाचे उदय सांगळे पिछाडीवर
12. इगतपुरी विधानसभा मतदारसंघ
सहाव्या फेरी अखेर अजित पवार गटाचे हिरामण खोसकर 26200 मतांनी आघाडीवर
काँग्रेसचे लकी जाधव पिछाडीवर
13. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ
तिसरी फेरी -
भाजपा - डॉ राहुल आहेर (7264)
प्रहार - गणेश निंबाळकर (584)
काँग्रेस - शिरीष कोतवाल (220)
अपक्ष - केदा आहेर (2601)
डॉ राहुल आहेर (9976) मतांनी आघाडीवर
14. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ
भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना चौथ्या फेरी अखेर 7624 मतांची आघाडी
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते पिछाडीवर
15. निफाड विधानसभा मतदारसंघ
सहावी फेरी
दिलीप बनकर 16000 मतांनी आघाडीवर
अनिल कदम पिछाडीवर
आणखी वाचा
मोठी बातमी! काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पिछाडीवर, संगमनेरमध्ये धक्कादायक निकाल येणार?