Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 25 आश्वासने दिली आहेत. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धापकाळ पेन्शन, 25 लाख नोकऱ्या आणि सरकारी नोकऱ्यांचा समावेश आहे.
![Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर! Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Will Uddhav Thackeray come with mahayuti Answer in two sentences from Union Home Minister Amit Shah Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/10/b01eedccd7df5b18886d8fa37972955a1731219659989736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amit Shah on Uddhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांनी आज (10 नोव्हेंबर) महाराष्ट्रात भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 25 आश्वासने दिली आहेत. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वृद्धापकाळ पेन्शन, 25 लाख नोकऱ्या आणि सरकारी नोकऱ्यांचा समावेश आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला.
'मी उद्धव ठाकरेंनाही काहीतरी आठवण करून देण्यासाठी आलो आहे'
जाहीरनाम्यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, "मी उद्धव ठाकरेंनाही काहीतरी आठवण करून देण्यासाठी आलो आहे. तुम्ही कुठे बसणार हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुम्ही ज्या जागेवर बसलात ती जागा 370 हटवण्यास विरोध करणाऱ्यांची आहे. तुम्ही रामजन्मभूमीचे नेते आहात. तुम्ही विरोध करणाऱ्यांसोबत आहात, तुम्ही सावरकरांना विरोध करणाऱ्यांसोबत आहात, जे सीएए-यूसीसीला विरोध करतात त्यांच्यासोबत आहात.
उद्धव ठाकरे सोबत येणार का?
आॅन उद्धव ठाकरे सोबत येणार? याबाबत अमित शाह म्हणाले की, कोणतेही किंतुपरंतू नाही, आमचं सरकार येणार आणि महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की मी महाराष्ट्रातील जनतेला सलग तिसऱ्यांदा महायुती सरकारला जनादेश देण्यास सांगत आहे. वीर सावरकरांचे नाव कोणत्याही काँग्रेस नेत्याने घ्यावे का? बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगान करू शकतात का? राहुल गांधींनी वीर सावरकरांसाठी दोन चांगले शब्द बोलून दाखवावे.
काँग्रेसवर हल्लाबोल
अमित शाह म्हणाले की, "मी म्हणतो की काँग्रेसने आश्वासने दिली तर ती विचारपूर्वक केली पाहिजेत, कारण ते आश्वासने पूर्ण करत नाहीत आणि मला उत्तर द्यावे लागेल. तेलंगणा, हिमाचल ही त्याची उदाहरणे आहेत. त्यांच्या आश्वासनांची विश्वासार्हता नरकात गेली आहे.
आरक्षणाची उलेमांची मागणीवर काय म्हणाले
काँग्रेसने अल्पसंख्याकांना आरक्षण द्यावे, अशी उलेमांची मागणी होती आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ती मंजूर केली आहे. तुम्ही काँग्रेसच्या हेतूशी सहमत आहात का? मागासवर्गीयांना आरक्षण, अनुसूचित जाती -एसटी मुस्लिमांना द्यायला हवं, आपल्या संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण दिलेलं नाही हे तुम्ही मान्य करता, असे अमित शाह म्हणाले. मोदीजींनी वक्फ बोर्ड सुधारण्यासाठी विधेयक आणले आहे. कर्नाटकातील प्रत्येक गावातील मंदिरे, शेतजमीन, घरे वक्फ मालमत्ता घोषित करण्यात आली आहे. वक्फ विधेयकावरून आम्ही महाराष्ट्राला इशारा देऊ इच्छितो की जर काँग्रेस आणि त्यांची आघाडी आली तर वक्फ तुमची मालमत्ता घोषित करेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)