एक्स्प्लोर

Ramesh Chennithala: महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं...'

Ramesh Chennithala: मित्रपक्षातील नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, पक्षांमध्ये मैत्रीपुर्ण लढती होत आहेत, त्या थांबवण्यासाठी महाविकास आघाडी मोठे प्रयत्न करत आहे

Ramesh Chennithala: विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपापल्या नेत्यांनी उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिले, त्यानंतर अर्ज सादर केलेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रमुख लढत मानली जात आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी मित्रपक्षातील नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, पक्षांमध्ये मैत्रीपुर्ण लढती होत आहेत, त्या थांबवण्यासाठी महाविकास आघाडी मोठे प्रयत्न करत आहे, तर आज काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही असं म्हटलं आहे, तर भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

निवडणुकीसाठीची मोठी तयारी सुरू आहे, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीतील पक्षात अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणावर आहेत. महायुती एक विचित्र युती आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षाच्या जागावरती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जागांवरती भाजप आपले उमेदवार देत आहे, त्यांच्या ठिकाणी देखील निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कोणता प्रवाभ नाही, किंवा त्यांचे अस्तित्व देखील नाही. भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीतून संपवलं आहे. मात्र महाविकास आघाडीत याउलट चित्र असल्याचं काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडीत आम्ही लहान पक्षांना ही सोबत घेतलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना आम्ही एकसारखं मानत आहोत. मात्र, महायुतीमध्ये भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवलं आहे. महाविकास आघाडीत एकता आहे, कोणतीही महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नाही, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले जातील. माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, काँग्रेसच्या हायकमांडनी ज्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे, त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही,मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.

मैत्रीपुर्ण लढत नाही

महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित काम करत आहोत. समाजवादी पार्टीसोबत आमची चर्चा सुरू आहे. ⁠नसीम खान यांच्यावर जबाबदारी दिली आहे. ४ तारखेच्या आधी सर्व मतभेद दुर करण्याचे प्रयत्न असतील,, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने कौल दिला आहे, त्याप्रमाणे महाविकास आघाडी काम करत आहे. शिंदे सरकार बिनकामाचं आहे, हे जनतेने ओळखले आहे, आत्तापर्यंत घेतलेले निर्णय पुर्ण केलेला नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी आणली. मात्र, त्यांनी आता बंद केली आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच नाव सांगत आहे. हे फक्त निवडणुकीसाठी घेतलेले निर्णय आहेत. राज्यातील जनतेच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी काम करेल असंही यावेळी ते म्हणालेत.

महाविकास आघाडीत कोणत्या ठिकाणी मैत्रीपुर्ण लढतीच आव्हान

महाविकास आघाडीमध्ये परांडा मतदारसंघात शरद पवार गटाकडून राहुल मोटे,तर उद्धव ठाकरे गटाकडून रणजित पाटील यांनी अर्ज सादर केले आहेत. 

पंढरपुरात शरद पवार गटाकडून अनिल सावंत, तर कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांनी अर्ज सादर केले आहेत. 

दिग्रसमधून कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, तर ठाकरे गटाकडून पवन जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

धारावी मतदारसंघातून कॉंग्रेसकडून ज्योती गायकवाड तर ठाकरे गटाकडून बाबुराव माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीत इतर लहान घटक पक्षांच्या उमेदवारीनी देखील अर्ज दाखल 

मानखुर्दमधून सपाकडून अबु आझमी तर ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे यांनी अर्ज केला आहे. 

सोलापुर शहर मध्य मधून कॉंग्रेसकडून चेतन नरोटे, तर मित्रपक्ष असलेल्या माकपकडून नरसय्या आडाम यांनी अर्ज दाखल केला आहे.

सांगोला मतदारसंघातून ठाकरे गटाकडून दिपक साळुंखे, तर मित्र पक्ष असलेल्या शेकापकडून बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला आहे. 

लोहा कंधारमधून ठाकरे गटाकडून एकनाथ पवार, तर शेकापकडून आशा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Embed widget