एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: 'काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच...', भाजपनं ठाकरेंना बॅग तपासणीवरून डिवचलं, शेअक केला देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ

BJP on Uddhav Thackeray Bag Check: वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यावरती भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray Bag Check: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांचे दौरे, प्रचार, सभा, रॅली मोठ्या प्रमाणावर काढल्या जात आहेत. अशातच विधानसभेच्या दौऱ्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची (सोमवारी) वणी येथे हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काल (मंगळवारी)  पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यावरती भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. 

काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते म्हणत भाजपचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी करण्यात आली होती. भाजप पक्षाकडून याबाबची व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

काय लिहलं आहे पोस्टमध्ये?

जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! 
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो 5 नोव्हेंबरचा व्हिडिओ) दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे.

उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील...-राज ठाकरे

राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, उद्धव ठाकरेंची आज निवडणूक आयोगाच्या लोकांनी बॅग तपासली. परवा पण असंच झालं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना कळत नाही. त्या बॅगमध्ये काय भेटणार. ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत त्यांच्या हातातून आणखीन काय निघणार. फार फार तर रुमाल आणि कोमट पाणी...असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली करताय, अरे आमच्या पण बॅग तपासल्या आहेत. अरे येवढा काय तमाशा करताय, अशी खोचक टीका देखील राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार महिलेला उडवणार तोच मदतीसाठी धावल्या पण आक्रीत घडलं, महिलेला कारनं  फरफटत नेलं
रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार महिलेला उडवणार तोच मदतीसाठी धावल्या पण आक्रीत घडलं, महिलेला कारनं फरफटत नेलं
Marathwada Ganapati Visarjan: मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 सप्टेंबर 2025 | शनिवार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
ओबीसी समाजाचं बारामतीत ठिय्या आंदोलन, मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी, ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार महिलेला उडवणार तोच मदतीसाठी धावल्या पण आक्रीत घडलं, महिलेला कारनं  फरफटत नेलं
रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार महिलेला उडवणार तोच मदतीसाठी धावल्या पण आक्रीत घडलं, महिलेला कारनं फरफटत नेलं
Marathwada Ganapati Visarjan: मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
सोन्याच्या दरानं ग्राहकांना दिला झटका, 22 कॅरेट सोनं एका लाखांवर, तर 24 कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्याच्या दरानं ग्राहकांना दिला झटका, 22 कॅरेट सोनं एका लाखांवर, तर 24 कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या सविस्तर माहिती 
त्यामुळे पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेणार; कर्नाटक सरकारच्या निर्णयाने अवघ्या देशात भूवया उंचावल्या!
त्यामुळे पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेणार; कर्नाटक सरकारच्या निर्णयाने अवघ्या देशात भूवया उंचावल्या!
Nirmala Sitharaman : 'रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार, तो आमचा निर्णय', केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अमेरिकेला प्रत्युत्तर
'रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवणार, तो आमचा निर्णय', केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं उत्तर
PHOTOS : बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला! देवदेवतांच्या वेशभूषा, ढोल-डीजेचा दणदणाट; नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह
बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला! देवदेवतांच्या वेशभूषा, ढोल-डीजेचा दणदणाट; नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह
Embed widget