बार्शीत ठाकरेंनी उतरवला मुरब्बी मोहरा, आमदार राजेंद्र राऊतांसमोर दिलीप सोपलांचं तगडं आव्हान
बार्शी विधानसभा मतदारसंघातून (Barshi assembly constituency) ठाकरेंनी एका मुरब्बी चेहऱ्याला संधी दिली. माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे.
![बार्शीत ठाकरेंनी उतरवला मुरब्बी मोहरा, आमदार राजेंद्र राऊतांसमोर दिलीप सोपलांचं तगडं आव्हान Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena Uddhav Thackeray group first 65 candidates list announced Dilip Sopal candidate from Barshi assembly constituency बार्शीत ठाकरेंनी उतरवला मुरब्बी मोहरा, आमदार राजेंद्र राऊतांसमोर दिलीप सोपलांचं तगडं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/23/241ef1d8b37b4de44f907b36ef0f5f3a1729697080564339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Sena Uddhav Thackeray Candidates List : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election) साठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, बार्शी विधानसभा मतदारसंघातून (Barshi assembly constituency) ठाकरेंनी एका मुरब्बी चेहऱ्याला संधी दिली. माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं बार्शीत पुन्हा दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत (Rajendra Raut) अशी पारंपारीक लढत पाहायला मिळणार आहे.
महायुतीकडून आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
सध्या बार्शी विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, अखेर आज दिलीप सोपल यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. महायुतीकडून अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत अशीच लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगोला, सोलापूर दक्षिणमध्येही ठाकरेंचे उमेदवार
सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंनी मोठा दणका दिला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून दीपक आबा साळुंखे पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं यावरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय.कारण, सांगोल्यातून महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकारपचे बाबासाहेब देशमुख हे इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सुटला आहे. त्यामुळं इथून शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख बंड करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसचे दिलीप माने आणि धर्मराज कादाडी हे इच्छुक होते. मात्र, तिथून ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं या मतदारसंघात देखील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. भाजपनंतर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Uddhav Thackeray Group) देखील 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)