मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena) आघाडी घेतली आहे. शिवसेना युबीटी पक्षाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर सर्वांना संधी मिळालेली आहे, आम्हाला अपेक्षित होत्या त्या सर्व जागांवर आमचे उमेदवार घोषित झाले आहेत. काही पक्षप्रवेश देखील आज पार पडले, त्यांना देखील उमेदवारी मिळाली. सहमतीने काही जागांवर आम्ही उमेदवार दिले आहेत. आमचा काही जागांवर आग्रह होता त्या जागा देखील आम्हाला मिळाल्या आहेत. मी फक्त एका मतदारसंघापूर्ती मर्यादित न राहता मला सगळ्या उमेदवारांसाठी काम करायचं आहे, काही ठिकाणी आमचे जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे त्या जागांवर देखील लवकरच नावं निश्चित होतील आणि त्या याद्या देखील बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया पहिल्या यादीनंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना ठाकरे गटाने 65 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे
पहिल्या यादीमध्ये 15 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे
शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.. अजय चौधरी की सुधीर साळवी ? याचा निर्णय दुसऱ्या यादीमध्ये घेतला जाईल
कोपरी पाच पाखडी या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी
ज्या जागांवर तिढा होता अशा जागा
रामटेक- विशाल बरबटे यांना उमेदवारी
नांदगाव गणेश धात्रक यांना उमेदवारी
सोलापूर दक्षिण अमर पाटील यांना उमेदवारी
सावंतवाडी राजन तेली यांना उमेदवारी
वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई यांना उमेदवारी
कर्जत नितीन सावंत यांना उमेदवारी
अनेक नव्या चेहऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने संधी दिली आहे
वरूण सरदेसाई
महेश सावंत
प्रवीणा मोरजकर
केदार दिघे
स्नेहल जगताप
समीर देसाई
सिद्धार्थ खरात
राजू शिंदे
या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds