Dilip Walse Patil: 'शरद पवारांची धास्ती जाणवली नाही...', दिलीप वळसेंना विजयाचा विश्वास, नेमकं काय म्हणालेत?
Dilip Walse Patil: शरद पवारांनी सभा घेतल्याची कोणतीही धास्ती नव्हती, विजय माझाचं होईल असा विश्वास वळसेंनी व्यक्त केला आहे.
पुणे: आज विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडत आहे. या दरम्यान सलग सात वेळा आमदार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आठव्यांदा आंबेगावच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. पत्नी आणि त्यांच्या मुलीने औक्षण केल्यावर ते मतदानासाठी निघाले. मात्र, यावेळी थेट शरद पवारांनी (Sharad Pawar) गद्दारीचा शिक्का मारत थेट आमच्यात कौटुंबिक संबंध नव्हेत, असं सूचित केलं. पण शरद पवारांनी सभा घेतल्याची कोणतीही धास्ती नव्हती, विजय माझाचं होईल असा विश्वास वळसेंनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणालेत वळसे पाटील?
यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, मी मतदारांना इतकंच आवाहन करेल. मी गेली 35 वर्ष या मतदारसंघाचे महाराष्ट्राची सेवा केलेली आहे. काम केलेला आहे. त्या आधारावर मला परत एकदा विधानसभेत जाण्याची संधी द्यावी आणि मला मतदान करावं. निवडणुकांचे प्रचार असतो वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात मात्र सगळ्यात महत्त्वाचा आहे मतदान मतदार करतो आणि मतदार देतो तोच रिझल्ट लागतो. त्यामुळे मतदार निश्चित प्रकारे मला यश देतील अशी माझी खात्री आहे असं पुढे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
सातवेळा मिळालेली आमदारकी आणि आठव्यांदा लढत असलेली निवडणूक यात काय फरक आहे. याबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, निवडणूक म्हटलं की प्रचार आला कसाही असला तरी तो प्रचारच आहे असं मत त्यांनी मांडलं आहे. शरद पवार यांच्या सभेनंतर काही धास्ती वाटते का? या प्रश्नावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, आमची जी सांगता सभा झाली त्या सांगता सभेला मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील जनतेने प्रतिसाद दिला त्याच्यावरून मला धास्ती घेण्याचं काहीच कारण वाटत नाही विजय हा निश्चित आहे असं दिलीप पाटलांनी म्हटलं आहे.
अमोल कोल्हेनी सांगितलं सत्तेची कोणाला हाव?
महायुती असो की महाविकासआघाडी प्रत्येकाला सत्तेची हाव आहे. यासाठीची मतदान प्रक्रिया सुरु आहे. दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे मात्र मिसळीवर ताव मारत आहेत. यावेळी सत्तेची चव आम्हालाच चाखायला मिळेल असा विश्वास कोल्हेनी व्यक्त केला आहे.
दिलीप वळसें विरोधात मी विजयी होणार! - देवदत्त निकम
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी त्यांच्या नागापुर या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला या वेळी मतदारांनी स्वभीमानाने मतदान करण्याचे आवाहन निकम यांनी केले. तसेच दिलीप वळसेंच्या मी निवडून येणार, याचं गणित मांडण्याचा प्रयत्न निकमांनी केला.