एक्स्प्लोर

Maharashtra Sharad Pawar NCP Candidate List 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली 35 जणांची संभाव्य यादी समोर; तीन सरप्राईज नावांचा समावेश!

Sharad Pawar NCP Candidate : इस्लामपूरमधून जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून रिंगणात असतील. काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे रिंगणामध्ये असतील. कर्जत जामखेडमधून रोहित पवार रिंगणात असतील.

 Maharashtra Sharad Pawar NCP Candidate List 2024 : महायुतीकडून भाजपकडून पहिल्यांदा यादी जाहीर करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा यादी जाहीर करण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत 17 जणांना एबी फॉर्म दिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची सुद्धा संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये 32 जणांचा समावेश असू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत कोणाचा समावेश? 

यामध्ये इस्लामपूरमधून जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून रिंगणात असतील. काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे रिंगणामध्ये असतील. कर्जत जामखेडमधून रोहित पवार रिंगणात असतील. घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे, तर मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड असतील. कवठे महाकाळमधून स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, सिंदखेडराजामधून राजेंद्र शिंगणे, राहुरीमधून प्राजक्ता तनपुरे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, कागलमधून समरजितसिंह घाटगे, इचलकरंजीमधून मदन कारंडे आणि चंदगडमधून डाॅ. नंदिनी बाभुळकर यांचा संभाव्य उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. दुसरीकडे नुकताच पक्ष प्रवेश केलेल्या आमदार दीपक चव्हाण फलटणमधून संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत.

पोर्शे कार अपघातावरून शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंविरोधात जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्याविरोधात बापू पठारे यांना उमेदवारीची शक्यता आहे. अलीकडील पक्षप्रवेश झालेल्या दीपक चव्हाण, राजेंद्र शिंगणे, समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संभाव्य यादी

१) जयंत पाटील- इस्लामपूर
२) रोहित पाटील - तासगाव कवठे महांकाळ
३) मानसिंग नाईक- शिराळा
४) बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
५) शशिकांत शिंदे- कोरेगाव
६) दीपक चव्हाण- फलटण
७) शिरुर- अशोक
८) इंदापूर- हर्षवर्धन पाटील 
९) वडगाव शेरी- बापू पठारे
१०) माळशिरस- उत्तमराव जानकर
११) कर्जत जामखेड- रोहित पवार
१२) काटोल- अनिल देशमुख
१३) विक्रमगड- सुनील भुसारा
१४) घनसावंगी - राजेश टोपे 
१५) मुंब्रा - जितेंद्र आव्हाड 
१६) जिंतूर- विजय भांबळे
१७) अहेरी- भाग्यश्री अत्राम
१८) सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
१९) उदगीर- सुधाकर भालेराव
२०) घाटकोपर पूर्व - राखी जाधव 
२१) चिपळूण- प्रशांत यादव
२२) राहुरी -प्राजक्त तनपुरे
२३) मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
२४) अकोले- अमित भांगरे
२५) पारनेर- राणी लंके
२६) बीड- संदीप क्षीरसागर
२७) केज- पृथ्वीराज साठे
२८) आंबेगाव- देवदत्त निकम
२९) जुन्नर- सत्यशील शेरकर
३०) इचलकरंजी- मदन कारंडे
३१) भूम परंडा- राहुल मोटे
३२) दौंड- रमेश थोरात
३३) कागल - समरतिजसिंह घाटगे 
३४) गंगापूर - सतीश चव्हाण 
३५) चंदगड - डाॅ. नंदाताई बाभूळकर 

इतर महत्वाच्या बातम्या 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...

व्हिडीओ

MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Embed widget