Parli Assembly constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
Parli Assembly constituency : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) फॅक्टर असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा कार्ड पुन्हा एकदा बाहेर काढत शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज (27 ऑक्टोबर) विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निवडणुकीसाठी (Parli Assembly constituency) तिसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक हाय व्होल्टेजमध्ये असणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात नुकताच पक्षप्रवेश केलेल्या राजेसाहेब देशमुख (Raje Saheb Deshmukh) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) फॅक्टर असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा कार्ड पुन्हा एकदा बाहेर काढत शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. त्यामुळे परळीमध्ये आता धनंजय मुंडे विरुद्ध राजेश राजेसाहेब देशमुख असा सामना रंगणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र, काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुंडेंच्या विरोधात कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अशातच पवारांची खेळी या मतदारसंघात महत्त्वाची मानली जाते आहे.
कोण आहेत राजेसाहेब देशमुख?
दरम्यान, एक महिन्यांपूर्वीच राजसाहेब देशमुख यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सुद्धा म्हटले होते. राजेसाहेब देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये मागील महिन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी बीड जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती पद सांभाळलं आहे. देशमुख हे काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते.
धनंजय मुंडेंविरोधात आव्हानात्मक परिस्थिती
दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेत जनतेशी संवाद सुरु होता. राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषीमंत्रीपद होते. लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री धनंजय मुंडे ही निवडणूक यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि पक्ष फुटीमुळे पुन्हा आव्हानात्मक जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. धनंजय मुंडे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या