(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा बारामती मतदारसंघाचे (Baramati Constituency) उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे येथे आता काका-पुतण्या यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत खासदार शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी हे विधान करून एका प्रकारे अजित पवार यांच्याविरुद्धच शड्डू ठोकला आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा केला उल्लेख
"हा प्रश्न फक्त बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. मी जवळपास सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास 48 पैकी 31 जागा निवडून आल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा मी अंत:करणापासून आभारी आहे. मी जनतेला विश्वास देतो की लोकसभेमध्ये जनतेने जी कामगिरी केलेली आहे, त्याची नोंद आम्ही आमच्या अंत:कारणात कायम ठेवलेली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झालेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्या जागा लढवत आहोत. सर्व जागांवर आम्ही एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करतोय," असं शरद पवार म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
शरद पवार युगेंद्र पवारांबद्दल काय म्हणाले?
मी हे म्हणणं योग्य आहे की नाही पण बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती क्वचितच कोणाल असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणात शक्ती देण्याचं काम बारामतीकरांनी केलं. त्याची सुरुवात 1965 सालापासून ते आजपार्यंत आहे. मी आतापर्यंत इतक्या निवडणुकींना मी उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथं राहावं लागायचं. नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :