Amit Thackeray : अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
माहीममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवार देण्यात येऊ नये, असा एक मतप्रवाह शिवसेना ठाकरे आहे. अर्थात, या संदर्भातील सर्वाधिकार राज ठाकरे यांचा असणार आहे.
Amit Thackeray : कोणतीही युती आघाडी न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये एकला चलो रे भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, काल (18 ऑक्टोबर) शिवतीर्थवर झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना मनसे नेत्यांकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या संदर्भात राज ठाकरे कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान अमित ठाकरे यांच्या उमेदवारी संदर्भात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. जर राज ठाकरे यांनी अमित यांना माहीममधून उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार देऊ नये, असा मतप्रवाह आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आदित्या ठाकरे यांचा पैरा फेडला जाणार?
2019 मध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी वरळीमधून विजय मिळवला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपताना त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे माहीममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवार देण्यात येऊ नये, असा एक मतप्रवाह शिवसेना ठाकरे आहे. अर्थात, या संदर्भातील सर्वाधिकार राज ठाकरे यांचा असणार आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील की नाही याचे उत्तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांना परळीमधून उमेदवारी
दुसरीकडे 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता, पण यंदा 2024 मध्ये मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांना वरळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवार दिली गेली तर मग वरळीमधून संदीप देशपांडे यांची उमेदवारी मागे घेतली जाणार का? असा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला सारून जर अमित ठाकरे यांचा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय झाल्यास कदाचित वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील सुद्धा उमेदवार मागे घेतला जाईल का? याचं उत्तर पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या