धर्माविरुद्धची लढाई लढावीच लागेल, या लढाईत माझा विजय निश्चित, माझ्याविरोधात कोण याचा विचार करत नाही : जितेंद्र आव्हाड
माझा विजय निश्चित आहे, पण थोडा वेळ वाट पाह लीड महत्वाचा आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं.
Jitendra Awhad: माझा विजय निश्चित आहे, पण थोडा वेळ वाट पाह लीड महत्वाचा आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं. आव्हाड यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत कळवा मुंब्रा ( Kalwa Mumbra) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी बोलत होते. माझ्याविरोधात कोण आहे यांचा विचार मी करत नाही, अजित पवार आले तरी मला काहीच फरक पडत नाही असे आव्हाड म्हणाले. नजिम मुल्ला यांच्या सोबतची लढाई म्हणजे धर्माविरुद्ध अर्धमाची लढाई आहे, ती लढाई लढावीच लागेल असे आव्हाड म्हणाले.
माझा विजय निश्चित
जितेद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवारांनी भर उन्हात उपस्थिती दर्शवली. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शरद पवारांना कळवा मुंब्र्यात भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, माझा विजय निश्चित आहे पण थोडा वेळ वाट पाह लीड महत्वाचा असल्याचे आव्हाड म्हणाले. वरचा परमेश्वर बघत आहे कोणाला जिंकवायचं तो ठरवेल असे आव्हाड म्हणाले. शरद पवार माझा बाप एवढ्या उन्हात आला मला आणखी काय पाहिजे. महाराष्ट्रात फक्त माझा अर्ज दाखल करण्यासाठी ते आले आहेत असे आव्हाड म्हणाले.
20 नोव्हेंबर रोजी मतदान 23 ला निकाल
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी आता विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, मनसे, शिंदे गटापाठोपाठ आता अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वत: अजित पवार रिंगणात उतरणार आहेत. तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच गिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे देखील मैदानात उतरले आहेत. अशातच कळबा मुंब्रा मतदारसंघातून अजित पवारांनी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. नजिम मुल्ला यांनाअजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हा यांच्यासमोर नजिम मुल्ला यांचं आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या: