एक्स्प्लोर

Amit Thackeray: 'वरळी'चा समुद्रही साफ करुन देणार; अमित ठाकरेंच्या विधानाने पिकला हशा, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

Amit Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने विधानसभेची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आणखी एक यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार, माहीम विधानसभा मतदारसंघातून आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसैनिकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर अमित ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

मनसेच्या उमेदवारांच्या यादीत नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. मी लहान पणापासून या भागात वाढलोय, आम्हाला या मतदार संघातले विषय मला माहित आहे. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहे. त्यामुळे समोर कुणीही आलं तरी मी लढणार, अशी भूमिका अमित ठाकरेंनी जाहीर केली. निवडून आल्यानंतर पहिला कोणाता मार्गी लावणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी माहीम-दादरमधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मी मार्गी लावणार...निसर्गाने दिलेला समुद्रकिनारा मला स्वच्छ करायचा आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 

आदित्य ठाकरेंनी सत्तेत असताना निवडणूक लढवली-

राज ठाकरेंकडे मी कधीही मतदारसंघाचा आग्रह केला नाही. मी स्वत: त्यांना सांगितलं, माझ्यासाठी 10 सीट कॉम्प्रमाईज झाल्या नाही पाहिजे. कोणासोबतही बोलू नका, असं अमित ठाकरे म्हणाले. राज ठाकरे मला नेहमी सांगतात हे राजकारण आहे. समोरचे कसे आहेत हे ओळखता आले पाहिजे. तुमचं राजकारण तुम्ही करा, आमचं राजकारण आम्ही करु. मी एकटं उभं राहून लढून काय फायदा?, राज ठाकरेंनी सांगितलंय, स्वबळावर म्हणजे स्वबळावर...पक्षाला गरज होती म्हणून मी निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मी माहीमकरांच्या प्रश्नासाठी एक दिवस देणार, असंही अमित ठाकरेंनी सांगितले. 

वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल- अमित ठाकरे

निवडून आल्यावर माहीम-दादरमधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मी मार्गी लावणार, असं अमित ठाकरेंनी म्हटल्यानंतर तुमच्या मतदारसंघालाचा लागून वरळीचा मतदारसंघही आहे. तुमच्या भावाच्या मतदारसंघातही समुद्रकिनारा आहे, असं पत्रकारांनी म्हटलं. वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल..तो (आदित्य ठाकरे) हो म्हटल्यावर वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. 

उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

माहीम विधानसभा मतदारसंघ मनसेकडून अमित ठाकरे, तर शिंदेकडून सदा सरवणकर रिंगणात असणार आहेत. तर ठाकरे गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. या मतदार संघात भाजप कार्यकर्ते सदा सरवणकर यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे भाजप अप्रत्यक्ष अमित ठाकरे यांना मदत करण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातमी:

ठाण्यात भाजपच्या संजय केळकरांविरोधात चक्रव्यूह?; स्वपक्षीय नेता फुटला, शिंदे गट-मनसेतूनही तगडे उमेदवार रिंगणात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Embed widget