एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बंडखोरांचं मन वळवण्यासाठी सत्तेत येण्यापूर्वीच मविआचे 'करारमदार'; महामंडळ आणि विधानपरिषदेचं आश्वासन

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आपल्या गटातील बंडखोरांची समजूत काढून अधिकृत उमेदवाराच्या विजयाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते राबत आहेत. राज्यात मविआची सत्ता आली तर तुम्हाला विधानपरिषदेची आमदारकी देऊ किंवा महामंडळ देतो, अशी आश्वासने मविआच्या नेत्यांकडून बंडखोरांना दिली जात असल्याचे समजते.

महायुती सरकारने अलीकडेच विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त आमदारांची 7 पदे भरली होती. मात्र, अद्याप 5 जागा रिक्त आहेत. मविआची सत्ता आल्यास यापैकी एका जागेवर तुम्हाला संधी देऊ, असे आमिष बंडखोरांना दाखवले जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि अशोक गेहलोत हे दोन ज्येष्ठ नेते मुंबईत ठाण मांडून बंडखोरांनी वाटाघाटी करत आहेत. तर ठाकरे गटाच्या बंडखोरांशी संजय राऊत हे चर्चा करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या बंडखोरांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या तिन्ही पक्षांच्या वाटाघाटीचे सूत्र  एकच दिसत आहे. मविआ सत्तेत आल्यावर विधानपरिषद किंवा महामंडळावर वर्णी लावू, असे बंडखोरांना सांगितले जात आहे. त्यामुळे आता मविआतील किती बंडखोर माघार घेणार, हे बघावे लागेल.

महायुतीकडून देवेंद्र फडणवीस बंडोबांना थंड करण्याच्या कामाला

राज्यातील तब्बल 35 जागांवर झालेल्या बंडामुळे महायुतीचे उमेदवार धोक्यात आहेत. यामध्ये संघ परिवार आणि भाजपशी निष्ठावंत असलेल्या अनेक जुन्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपची आणि पर्यायाने महायुतीची डोकेदुखी वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही बंडखोरी शमवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी दिवसभर फोनाफोनी करत होते, असे सांगितले जाते. काही बंडखोरांना चर्चेसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे. याशिवाय, रावसाहेब दानवे, डॉ. भागवतराव कराड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय या नेत्यांवरही बंडखोरांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.

रमेश चेन्नीथलांचे 36 बंडखोरांना फोन

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या मुंबई येथील वॉर रूम बसून राज्यभरातील 36 बंडखोरांना व्यक्तीश फोन करत अर्ज मागे घेण्याची विनंती केली. यात काँग्रेसचे उमेदवार असलेल्या विधानसभा मतदार संघासह ठाकरे गट व शरद पवार गट यांच्या मतदारसंघात उभे राहिलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांचा समावेश आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला तुमच्या मदतीची गरज आहे. पक्ष सत्तेत  आपल्या नंतर पक्ष तुम्हाला योग्य तो न्याय देईल असे आश्वासन रमेश चेन्नीथला या बंडखोरांना दिले.

आणखी वाचा

मैत्रीपूर्ण लढत, बंडखोरी ते आयात उमेदवार,महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळात गोंधळ; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
Sunil Shelke: दादांच्या शिलेदार कोंडीत! भाजप, शरद पवारांनंतर मनसेनं दिला अपक्षाला पाठिंबा; शेळकेंविरोधात 'मावळ पॅटर्न' यशस्वी होणार?
दादांच्या शिलेदार कोंडीत! भाजप, शरद पवारांनंतर मनसेनं दिला अपक्षाला पाठिंबा; शेळकेंविरोधात 'मावळ पॅटर्न' यशस्वी होणार?
Ravi Raja resign: दिवाळीच्या पहिल्या दिवशी रवी राजांनी नाराजीची वात पेटवली, मुंबई काँग्रेसमध्ये धमाका होणार? वर्षा गायकवाड टार्गेटवर
दिवाळीच्या पहिल्या दिवशी रवी राजांनी नाराजीची वात पेटवली, मुंबई काँग्रेसमध्ये धमाका होणार? वर्षा गायकवाड टार्गेटवर
Manoj Jarange: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaba Bagul Diwali : पुण्यात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नानEknath Shinde Vidhansabha Election:चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणारCM Eknath Shinde Wish Diwali Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा!ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 30 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
Sunil Shelke: दादांच्या शिलेदार कोंडीत! भाजप, शरद पवारांनंतर मनसेनं दिला अपक्षाला पाठिंबा; शेळकेंविरोधात 'मावळ पॅटर्न' यशस्वी होणार?
दादांच्या शिलेदार कोंडीत! भाजप, शरद पवारांनंतर मनसेनं दिला अपक्षाला पाठिंबा; शेळकेंविरोधात 'मावळ पॅटर्न' यशस्वी होणार?
Ravi Raja resign: दिवाळीच्या पहिल्या दिवशी रवी राजांनी नाराजीची वात पेटवली, मुंबई काँग्रेसमध्ये धमाका होणार? वर्षा गायकवाड टार्गेटवर
दिवाळीच्या पहिल्या दिवशी रवी राजांनी नाराजीची वात पेटवली, मुंबई काँग्रेसमध्ये धमाका होणार? वर्षा गायकवाड टार्गेटवर
Manoj Jarange: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
धक्कादायक... नागपुरात नदीकिनारी 800 आधारकार्ड सापडल्याने खळबळ, समोर आलं महत्त्वाचं कारण
धक्कादायक... नागपुरात नदीकिनारी 800 आधारकार्ड सापडल्याने खळबळ, समोर आलं महत्त्वाचं कारण
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?
राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?
महाविकास आघाडी 'या' तारखेपासून राेवणार प्रचाराची मुहूर्तमेढ, शरद पवार म्हणाले, राहूल गांधी,मी आणि शिवसेना मिळून..
महाविकास आघाडी 'या' तारखेपासून राेवणार प्रचाराची मुहूर्तमेढ, शरद पवार म्हणाले, राहूल गांधी, मी आणि शिवसेना मिळून..
Ravi Raja resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार
Embed widget