कुठं खिचडी, कुठं टफ फाईट! कोणाचं होणार कॉलर टाईट; संभाजीनगरकरांनी सांगितलं शहरात कुणाची हवा!
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. याच संभाव्य निकालावर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यभरातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला. दरम्यान, आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचा निकाल दिला आहे. वेगवेगळ्या संस्थांनी राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार, याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात नेमकं कोण बाजी मारणार, याबाबत खुद्द तेथील मतदारांनीच सांगितलं आहे.
संभाजीनगकरांना नेमकं काय वाटतं?
मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर एबीपी माझाने संभाजीनगरमधील नागरिकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली. तर काही मतदारांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल, असं मत व्यक्त केलं. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मतदारसंघांत खिचडी म्हणजेच कोण विजयी होईल, हे सांगता येणार नाही, असं सांगितलं. तर काही जागांवर टफ फाईट म्हणजेच अटीतटीची लढाई होईल, अशी शक्यता व्यक्त केली.
लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाला, असं वाटतं
एका महिलेने बोलताना संभाजीनगरात खूप साऱ्या समस्या आहेत. जो कोणी निवडून येईल, त्याने या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा मतदानाचा टक्का कमी होईल, अशी शंका व्यक्त केली. तसेच राज्यात महायुतीचं सरकार येऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला. अन्य एका मतदाराने राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येईल, असे सांगितले. हा मतदार औरंगबाद पश्चिम या मतदारसंघातील मतदार आहे. या मतदाराने औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट हे बहुमतात निवडून येतील, अशं सांगितलं. यावेळच्या निवडणुकीत महायुतीची ताकद दिसली. लोकांमध्ये उत्साह होता. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाला, असं मला वाटतं, असंही या मतदाराने सांगितलं.
राज्यात महाविकास आघाडीचा जोर दिसला
आणखी एका 45 वर्षीय मतदाराने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच राज्यात आता परिवर्तन पाहिजे. माझ्या जिल्ह्यात दोन्ही शिवसेनेत अटीतटीची लढत आहे. पण राज्यात महाविकास आघाडीचा जोर दिसला, असं मत या मतदाराने व्यक्त केलं.
देशाला आणि जनतेला परिवर्तन पाहिजे
तर खरेदीसाठी आलेल्या आणखी एका महिला मतदाराने प्रतिक्रिया दिली. राज्यात यावेळी महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे वाटत आहे. जिल्ह्यातही महाविकास आघाडीच वरचढ ठरेल, असं मला वाटतंय असं या महिलेने सांगितलं. तसेच देशाला आणि जनतेला परिवर्तन पाहिजे, अशी अपेक्षाही या महिलेने व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण मतदाराने राज्यात सरकार मशालचं येईल, असं म्हणत महाविकास आघाडीचं सरकार येईल, असं मत व्यक्त केलं.
हेही वाचा :